पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशा चर्चा होत्या. मात्र, आपण भाजपात सामील होणार नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलंय. एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, “आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पासून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात असून ते असहनीय आहे,” असंही त्यांनी म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आज अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. डोवाल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी अमरिंदर सिंग यांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार अमरिंदर सिंग यांनी काही महत्वाची कागदपत्र अजित डोवाल यांच्याकडे सुपूर्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही कागदपत्रं नक्की कशासंदर्भात आहेत याबद्दल खुलासा होऊ शकतेलेला नाही. 

आपल्या क्षमतांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अनुसुचित जातीचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे अमरिंदर सिंग भाजपात जातील, अशी चर्चा होती. मात्र, आपण भाजपात जाणार नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अमरिंदर सिंग  यांचं पुढचं पाऊल नक्की काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not joining bjp but will not stay in congress says amarinder singh day after meeting amit shah hrc
First published on: 30-09-2021 at 13:54 IST