ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या घटनेवरून विरोधी पक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याला आता अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ही राजकारण करण्याची वेळ नाही,” अशा शब्दांता अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांनी फटकारलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ही राजकारण करण्याची वेळ नाही. बचावकार्यावर आमचं लक्ष आहे. पूर्ण ताकदीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देत आवश्यक सूचना दिल्या आहे. घटनेची चौकशी करून १५ ते २० दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल,” अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वेच्या ‘कवच’ या यंत्रणेवरूनही विरोधी पक्षाने अश्विनी वैष्णव यांना लक्ष्य केलं. यावर रेल्वेमंत्री म्हणाले की, “ही बाब कवच यंत्रणेची नाही. तपास अहवालात सर्व काही समोर येईल. अशा प्रकारच्या अपघातात मानवी संवेदनशीलता खूप महत्वाची आहे. आमचं पहिलं काम बचावकार्याचं आहे,” असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली आहे. यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ही घटना दुर्दैवी असून, मनाला विचलित करणारा अपघात आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झालाय, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दुख:त सहभागी आहे.”

“सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर आहे. सर्व तपासाचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार आहे. त्यांना सोडणार नाही. ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. येथील नागरिकांनाही संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचं काम केलं,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not the time for politics says railway minister vaishnaw amid calls for resignation over odisha accident ssa
First published on: 03-06-2023 at 22:59 IST