अश्विनी खांडेकर
अप्रायजलच्या वेळीही पहिला प्रश्न हाच असतो, ‘तुमच्या केपीआयवर परफॉर्मन्स कसा होता? पण, प्रत्यक्षात आपण फक्त केपीआयमध्ये लिहून दिलेलंच काम करतो का? बहुतेक वेळा नाही. गेल्या काही वर्षांत ऑफिसमध्ये ङढक (की परफॉर्मन्स इंडिकेटर) आणि ङफअ (की रीझल्य एरिया) याबद्दल खूप चर्चा होताना दिसते. प्रत्येकाला आपले केपीआय स्पष्ट हवे असतात, केआरए निश्चित केलेले हवे असतात. अप्रायजलच्या वेळीही पहिला प्रश्न हाच असतो, ‘तुमच्या केपीआयवर परफॉर्मन्स कसा होता? पण, प्रत्यक्षात आपण फक्त केपीआयमध्ये लिहून दिलेलंच काम करतो का? बहुतेक वेळा नाही.
माझ्या एका संस्थेत मला एकदा एक्सेप्शनल कॉन्ट्रिब्युशनसाठी ॲवॉर्ड मिळाला होता. गंमत म्हणजे ज्या कामासाठी तो ॲवॉर्ड मिळाला, ते माझ्या केपीआय किंवा केआरएमध्ये नव्हतंच. त्या वेळी संस्थेला त्या कामाची गरज होती आणि म्हणून मी ते केलं. काही काळानंतर माझ्याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणून सांगितलं जायचं की तू खूप फ्लेक्झिबल आहेस, संस्थेला जिथे गरज आहे तिथे काम करायला तयार असतेस. पण, काही वर्षांनी हीच गोष्ट मला माझ्या प्रोफाइलची सगळ्यात कमकुवत बाजू वाटायला लागली. मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या की सीव्ही बनवताना मलाच प्रश्न पडला, ‘ माझ्या कामातलं नेमकं हायलाइट काय करायचं आणि काय सोडायचं? खंू‘ ःऋ ं’’ ३१ंिी२, ें२३ी१ ःऋ ल्लःल्ली म्हणतात, माझ्या बाबतीत कधी कधी ्नंू‘ ःऋ ँं’ऋ ३ँ्रल्लॠ२ हाच विचार डोक्यात घोळायला लागला. आणि मग नेहमीप्रमाणे माझं ओव्हरथिंकिंग सुरू झालं.
आपण एखाद्या व्यक्तीला एका ठरावीक रोल किंवा जबाबदारीसाठी हायर करतो, तर त्या रोलचा करीअर पाथ आधीपासून का ठरलेला नसतो? अनेकदा सीनियर आपल्या ज्युनियरला म्हणताना आपण ऐकतो, ‘‘तुझे केपीआय बनवून मला पाठव. मग आपण बसून ते करेक्ट करू.’’ पण, केपीआय ठरवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? नुकताच जॉइन झालेला कर्मचारी बिझनेसमध्ये नवीन असतो. कंपनीची मोठी उद्दिष्टं, त्या वर्षाच्या प्रायॉरिटीज, त्याच्या रोलकडून असलेल्या अपेक्षा… या सगळ्याची पूर्ण कल्पना त्याला पहिल्याच दिवशी कशी असणार? मग त्याने स्वत:च ठरवायचं की त्याचं काम काय आहे आणि वर्षाच्या शेवटी त्याचं इव्हॅल्यूशन कशावर होणार?
‘‘आपण स्टार्टअपसारखे काम करतो.’’
‘‘जिथे लूज एन्ड्स दिसतील तिथे काम सुरू करा.’’
‘‘इथे प्रत्येकाने सगळं बघायचं असतं.’’
ही वाक्यं ऐकायला एक्सायटिंग वाटू शकतात. आणि काही प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी प्रत्येक रोलमध्ये असायलाच हवी. पण, फ्लेक्झिबिलिटी आणि लॅक ऑफ क्लॅरिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचा कोअर रोल काय आहे, तुमच्याकडून नेमकं काय काम (आऊटकम्स) अपेक्षित आहेत आणि तुमचा परफॉर्मन्स कशावर मोजला जाणार आहे, हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्याच्या बाहेर तुम्ही कितीही नवीन जबाबदार्या घ्या. म्हणून ऑफर लेटर साइन करण्याआधी फक्त डेसिग्नेशन, सॅलरी आणि रिपोर्टिंग मॅनेजर कोण-काय एवढं विचारून थांबू नका.
तुमच्याकडून पद स्वीकारल्यानंतर पहिल्या सहा ते बारा महिन्यांत नेमक्या काय अपेक्षा आहेत? केआरए काय असतील? परफॉर्मन्स मोजण्याची पद्धत काय आहे? ग्रोथ पाथ कसा ठरतो? अप्रायझल प्रोसेस कशी चालते? आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या होणार्या बॉसला विचारा, ‘‘या रोलमध्ये माझा कामाचा एक साधारण दिवस कसा दिसेल?’’ माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये माझ्या होणार्या बॉसने माझ्या रेझ्युमेच्या मागच्या बाजूला चार गोष्टी लिहिल्या होत्या. या चार एरियाजवर तुला काम करायचं आहे. प्रत्येक एरियाला किती महत्त्व असेल, तेही त्याने पर्सेन्टेजमध्ये लिहिलं. माझा साधारण वर्किंग डे कसा असेल, हेदेखील त्याने समजावून सांगितलं. मी अजून ऑर्गनायझेशनमध्ये जॉईनही झाले नव्हते, पण माझं काम काय असेल, माझ्याकडून काय अपेक्षित असेल आणि मला कशावर फोकस करायचं आहे याची क्लॅरिटी मला त्याआधीच मिळाली होती. आजही तो इंटरव्ह्यू मला आठवतो.
करिअरमध्ये नवीन गोष्टी करायला मिळणं चांगलंच आहे. आपल्या जॉब डिस्क्रिप्शनच्या बाहेर जाऊन काही करणंही चुकीचं नाही. अनेकदा तिथूनच आपल्याला नवीन स्किल्स आणि नवीन संधी मिळतात. पण, प्रत्येक नवीन जबाबदारी तुमच्या रोलमध्ये किंवा रोजच्या कामात ॲड होत असेल, तर कधीतरी थांबून एक प्रश्न विचारायला हवा, ‘या सगळयामुळे माझं करिअर कुठल्या दिशेला जाणार आहे? कारण, केपीआय फक्त अप्रायझल फॉर्म भरण्यासाठी नसतात. तो एम्प्लॉयी आणि ऑर्गनायझेशन या दोघांमध्ये झालेला एक स्पष्ट करार असायला हवा, ‘तुम्ही मला कशासाठी हायर केलं आहे, माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि या कामातून मी पुढे कुठे जाऊ शकतो. कदाचित, ही क्लॅरिटी सुरुवातीलाच मिळाली, तर वर्षाच्या शेवटी अप्रायझल फॉर्म भरताना दोन्ही बाजूंना कमी सरप्राइजेस असतील.
