जगभरातील सर्वच देश करोना विरोधात लढा देत आहेत, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. नोव्हावॅक्सच्या करोनावरील लशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. ही लस १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनी दिली जाईल. नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 म्हणूनही ओळखली जाते. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ही लस बनवत आहे. भारतात ती Covovax या नावाने ओळखली जाईल. ही पहिली प्रोटीन-आधारित लस आहे.

सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. तर, कोवोव्हॅक्स ही भारतातील चौथी अशी लस आहे जी देशात १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल. याआधी भारतात बायोलॉजिकल ई ची Corbevax, झायडस कॅडिलाची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची Covaccine १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
rbi 200 currency notes
RBI Alert: १ एप्रिलला २००० च्या नोटा स्वीकारणार नाही, आरबीआयनं केलं जाहीर!

८० टक्के प्रभावी –

नोव्हावॅक्सने गेल्या महिन्यात सांगितले होते की त्यांची लस ८० टक्के प्रभावी आहे. भारतात १२ ते १७ वर्षे वयोगटातील २ हजार ७०७ मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. नोव्हावॅक्सची लस ‘कोव्होव्हॅक्स’ला गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच मंजूरी देण्यात आली होती. पण तेव्हा ही मान्यता केवळ १८ वर्षांवरील लोकांसाठी होती. Covovax ला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े