पेट्रोल आणि विनाअनुदानित गॅस स्वस्त

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना किंचित दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे ८५ पैशांनी, तर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घोषित केला.

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना किंचित दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे ८५ पैशांनी, तर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घोषित केला. या निर्णयामुळे मुंबईत आता पेट्रोल १.०७ रु.ने स्वस्त झाले असून त्याचा प्रति लिटर दर ७४.१४ रु. राहील. मुंबईत १४.२ किलो वजनाचा विनाअनुदानित गॅस सिलिंडर आता ९१२ रुपयांना मिळेल. पेट्रोलची ही दरकपात सोमवारी मध्यरात्रीपासूनच अमलात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पेट्रोलच्या दरात गेल्या दोन आठवडय़ांत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Now prise decrease of petrol and gas

ताज्या बातम्या