कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टरची हत्या आणि बलात्काराचं प्रकरण ताजं आहे. या प्रकरणी मोर्चा आणि निदर्शनं होत आहेत. अशात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नर्सवर बलात्कार करुन तिची हत्या (Rape On Nurse) केली. या प्रकरणात पोलिसांनी धर्मेंद्र कुमार नावाच्या नराधमाला अटक केली आहे. नेमकी काय घटना आणि कुठे घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कुमारला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. ३० जुलैला एक नर्स तिच्या रुग्णालयातून बाहेर पडून घरी चालली होती. त्यावेळी धर्मेंद्रने तिला गाठलं त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि बलात्कारानंतर तिची हत्या (Rape On Nurse) केली. ३१ जुलैला या नर्सच्या बहिणीने पोलिसात तक्रार केली. ही नर्स उत्तराखंड येथील उधमसिंग नगर भागातल्या एका रुग्णालयात काम करत होती. पोलिसांनी नेमकं काय सांगितलं? उधमसिंग नगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मंजुनाथ टी.सी. यांनी सांगितलं की ३० जुलैला आम्हाला नर्स बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या बहिणीने केली. आम्ही त्यानंतर तिच्या शोधासाठी पथकं तयार केली. आम्हाला हे कळलं की तिच्यावर हल्ला होण्याआधी ती एका गावात गेली होती. त्यानंतर साधारण आठवडाभराने आम्हाला या नर्सचा मृतदेह (Rape On Nurse) सापडला. हा मृतदेह एका मोकळ्या मैदानात आढळून आला. त्यानंतर आम्ही ८ ऑगस्टला हे नक्की झालं की तो मृतदेह बेपत्ता झालेल्या नर्सचाच आहे. आरोपीला राजस्थानातून करण्यात आली अटक पोलिसांनी पुढे सांगितलं की आम्हाला त्या नर्सचा मोबाईल फोन राजस्थानमध्ये सापडला. त्यानंतर आम्ही पुढे तपास केल्यावर आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेजही मिळालं. ज्यामध्ये आरोपी या नर्सचा पाठलाग करताना दिसत होता. उत्तर प्रदेशातल्या बरेलीतून धर्मेंद्र कुमारला अटक (Rape On Nurse) करण्यात आली. तो उत्तराखंडच्या उधमसिंग नगर भागात रोजंदारीवर काम करण्यासाठी येत होता. त्याला आम्ही राजस्थानातून अटक केली. या घटनेनंतर तो तिकडे गेला होता. हे पण वाचा- Kolkata Rape Case : “पोलीस आमच्यापेक्षाही वेगाने पळून गेले”, कोलकात्यातील रुग्णालयात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी परिचारिकांची संतप्त प्रतिक्रिया! ३० जुलैला नर्सवर बलात्कार करुन तिची हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कुमारने ३० जुलै रोजी उधमसिंग नगर येथील रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सचा पाठलाग केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर (Rape On Nurse) धर्मेंद्र कुमारने या नर्सची हत्या केली. धर्मेंद्र कुमार हा एक ड्रग अॅडिक्ट आहे. त्याला ही नर्स कोण हे माहीतही नव्हतं. त्याने तिला घरी जाताना पाहिलं त्यानंतर त्याने तिला थांबवलं. पण यानंतर त्या महिलेने त्याला प्रतिकार केला. ज्यानंतर धर्मेंद्र कुमारने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. त्यानंतर या महिलेच्या अंगावर असलेले दागिने, पैसे घेऊन धर्मेंद्र कुमार फरार झाला. धर्मेंद्र कुमारने त्याचा गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांना त्याने गुन्हा केला त्यावेळचे कपडेही मिळाले आहेत. तसंच मोबाइल फोन आणि सिम कार्डही सापडलं आहे.