03-nyakim-gatwech‘क्वीन ऑफ डार्क’ नावाने ओळखली जाणारी न्याकिम गेटवे या सुदानच्या मॉडेलचा सध्या इंटरनेटवर बोलबाला आहे. शरीराचा वर्ण सुंदर आणि आकर्षक दिसण्याच्या आड येत नसल्याचे तिने सिद्ध केले आहे. मॉडेलिंग क्षेत्रात अतिशय सहजतेने वावरणाऱ्या न्याकिमला वर्णावरून कोणी बोचरी टीका केल्यास हजरजबाबी न्याकिमदेखील त्या व्यक्तीस योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देऊन त्याची बोलती बंद करते. (Photo: Instagram)

04-nyakim-gatwechअलीकडेच उबेर कॅबमधील प्रवासादरम्यान ड्रायव्हरने न्याकिमला तिच्या वर्णावरून प्रश्न विचारला होता. हा किस्सा कथन करताना ती सांगितले की, मला वाईट वाटणार नाही याची खात्री करून उबेर चालकाने विचारले, जर तुला स्किन ब्लिच करण्यासाठी १० हजार डॉलर्स दिले, तर तू स्किन ब्लिच करशील का? यावर माझे उत्तर नाही असे होते आणि त्याच्या प्रश्नावर मला हसू आले. (Photo: Instagram)

01-nyakim-gatwechकितीही पैसे देऊ केले तरी मी स्वत:च्या त्वचेशी छेडछाड करणार नाही. देवाने बहाल केलेल्या रंगासोबत मी छेडछाड का करावी, असा प्रश्नदेखील तिने ड्रायव्हरकडे उपस्थित केला. तर तुझा ‘डार्क कलर’ ही देवाची देण आहे असे तुझे मानणे आहे, असे म्हणत न्याकिमच्या उत्तरावर ड्रायव्हरने प्रतिक्रिया नोंदवली. (Photo: Instagram)

02-nyakim-gatwechरंग आणि दिसण्यावरून मी कशा स्वरुपाच्या प्रश्नांना सामोरी गेले आहे याचा अंदाजदेखील तुम्ही बांधू शकणार नाही, असे ती सांगते. मॉडेलिंगसाठी अमेरिकेत आल्यापासून अनेकवेळा तिला त्वचेच्या रंगावरून टिकेचा सामना करावा लागला आहे. देवाने बहाल केलेला रंग आणि रुपाचा सन्मान करावा तसेच स्वत:ला कमी लेखू नये यासाठीच कॅब ड्रायव्हरचा किस्सा कथन केल्याचे ती सांगते. (Photo: Instagram)

05-nyakim-gatwechकारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक टिकांना सामोरे जावे लागले होते. परंतु, निराश न होता तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपले पाय रोवले. (Photo: Instagram)

06-nyakim-gatwechआपल्या वर्णाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहणाऱ्या न्याकिमचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोअर्स आहेत. (Photo: Instagram)