पीटीआय, नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. न्या. पंकज मित्तल, न्या. संजय कारोल, न्या. पी.व्ही. संजय कुमार, न्या. अहसानुद्दिन अमानुल्लाह आणि न्या. मनोज मिश्रा यांनी शपथ घेतली. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ झाली असून दोन जागा रिक्त आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या पाच जणांची नावे सुचवली होती, मात्र या मुद्दय़ावरून न्यायालय आणि केंद्र सरकारदरम्यान मतभेद झाले होते.
