जगभरामध्ये ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या नवीन विषाणूचा संसर्ग लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात होत असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतामध्येही आतापर्यंत या विषाणूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आता ओडिशामधील एका प्रकरणामुळे सर्वांचीच चिंता वाढलीय. ओडिशामधील जाजपुर जिल्ह्यामधील एका सरकारी शाळेतील ९ मुलांना करोनाची लागण झालीय. मात्र हा संसर्ग ओमायक्रॉनमुळे झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही जगभरामध्ये कमी वयाच्या लोकसंख्येमध्ये ज्या झपाट्याने ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होतोय ते पाहता ओडिशामधील हा प्रकार चिंतेत भर घालणारा आहे.

नक्की वाचा >> Omicron: लहान मुलांमधील संसर्ग वाढला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या ० ते ५ वयोगटातील रुग्णसंख्येत वाढ

drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाचा संसर्ग झालेल्या मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी चक्रवर्ती राठौड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीने या संस्थेमधील सर्व मुलांची तसेच कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. १८२ विद्यार्थी आणि ११ शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी ९ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढलून आलेत. आम्ही शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर बिरानची बारीक यांनी एएनआयशी बोलताना दिलीय.

नक्की पाहा हे फोटो >> ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ, मुलांमधील वाढता संसर्ग अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली

ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?
महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.