ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे देशात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत ३०० च्या आसपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. अशात माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अपघाताबाबत मोठी शंका व्यक्त केली आहे. “हा अपघात कट असू शकतो. कारण, अपघाताची वेळ संशयास्पद आहे,” असं त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ही घटना एक कट असू शकते. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. या घटनेची वेळ संशयास्पद आहे. रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होऊन, विश्लेषण व्हायला हवं,” अशी मागणी त्रिवेदी यांनी केली आहे.

हेही वाचा : “मी ट्रेनमधील पंख्याला पकडून…”, रेल्वे अपघातातून बचावलेल्या प्रवाशाचा थरारक अनुभव; म्हणाला, “सीटखाली दोन वर्षांचा मुलगा…”

“भूकंपानंतर जे चित्र असतं, तसं रेल्वेच्या अपघातानंतर झालं आहे. जपानसारखं रेल्वे अपघातात एकही मृत्यू होऊ नये, हाच आपला उद्देश असावा. नवीन तंत्रज्ञानाचा रेल्वेत समावेश केला जात आहे,” असेही त्रिवेदी यांनी सांगितलं.

हेही वाचा : खोलीत असंख्य मृतदेह अन् मुलाला शोधणारे हतबल वडील, ओडिशा दुर्घनेतील हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

“पश्चिम बंगालमधील कोलकातात २०१० साली मोठा रेल्वे अपघात झाला होता. या घटनेत मालगाडीने गीतांजली एक्स्प्रेसला धडक दिली होती. या अपघातानंतर दहा वर्षे तेथे रेल्वे गाड्या धावल्या नव्हत्या. या दुर्घटनेत १५० ते १८० लोकांचा मृत्यू झाला होता. चौकशी आयोगाने ही घटना मोठी शोकांतिका असल्याचं म्हटलं होतं,” अशी माहितीही त्रिवेदी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha train accident cospiracy may be timing strange former railway minister dinesh trivedi demand investigation ssa
First published on: 03-06-2023 at 17:18 IST