ओडिशा ट्रेन अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताने सगळा देश हादरला. या अपघातानंतर ५१ तास वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरु होतं. या अपघातानंतर गदारोळ आणि गोंधळही झाला. तसंच मृतदेहांची ओळखही पटवली जात होती. मात्र हेलाराम मलिक यांना आशा होती की आपला मुलगा जिवंत आहे. त्यांनी शोध सुरुच ठेवला अखेर मृतदेहांच्या ढिगातून त्यांनी आपल्या मुलाला शोधलंच. या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे.

नेमकी काय घडली घटना?

ओडिशा ट्रेन अपघातात २४ वर्षीय बिस्वजीत मलिक हा मुलगा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याचा मृत्यू झाला आहे असं बचाव पथकाला वाटलं होतं. त्यामुळे या मुलाला मृतदेहांच्या ट्रकमध्ये ठेवलं गेलं. हा ट्रक शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जाणार होता. त्यावेळी हेलाराम मलिक यांनी आपल्या मुलाचा शोध सुरु केला. या मृतदेहांच्या ट्रकमध्ये त्यांना आपल्या मुलाचा हात हलताना दिसला. त्यावेळी त्यांनी तातडीने बचाव पथकाला सांगितलं माझा मुलगा जिवंत आहे. त्यानंतर कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात मुलाला आणलं गेलं. डॉक्टर म्हणाले की बिस्वजीत मलिकची प्रकृती नाजूक आहे. काही दिवसात त्याच्यावर सर्जरी करण्यात येईल. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

हेलाराम मलिक यांनी काय सांगितलं?

बिस्वजीतचे वडिल हेलाराम यांनी सांगितलं की बालासोरला येण्यासाठी मी २३० किमी प्रवास अँब्युलन्सने केला. जेव्हा मला कळलं की अपघात झाला आहे तेव्हा मी मुलाच्या मोबाइलवर फोन केला होता. प्रतिसाद आला नाही म्हणून मी एका रुग्णवाहिकेसह आलो. मात्र बालासोरच्या एकाही रुग्णालयात मला माझा मुलगा सापडला नाही. तिथे आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं की बहानागा हायस्कूलमध्ये जा. तिथे काही मृतदेह ठेवले आहेत. सुरुवातीला आम्हाला मृतदेह पाहू दिले नाहीत. मात्र मी जेव्हा मुलाचा हात थरथरताना पाहिला तेव्हा मी नीट पाहिलं तो माझा मुलगा बिस्वजीत होता. त्याला आम्ही घेऊन कोलकाता येथे आलो.

आणि शवागृहात गोंधळ उडाला

हेलाराम यांच्यासह त्यांचे मेहुणे दीपक दासही आले होते. त्यांनीही याबाबत माहिती दिली. दास म्हणाले की, कुणीतरी पाहिलं की तिथल्या एका मृतदेहाचा हात हलतो आहे. त्यानंतर मात्र शवगृहात एकच गोंधळ उडाला. आम्ही तिथेच असल्यामुळे ही सर्व घटना पाहत होतो. जेव्हा आम्ही तो हात हलताना पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आले की ही हात बिस्वजीतचा आहे. बिस्वजीत तेव्हा गंभीर जखमी होता आणि पूर्णपणे बेशुद्ध होता. आम्ही तात्काळ त्याला रुग्णवाहिकेमधून बालासोरच्या रुग्णालयात आणले. त्यानंतर तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची अवस्था पाहून आम्हाला त्याला कटकच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला परंतु आम्ही त्याला आमच्या सोबत घेऊन आलो.

२ जून रोजी झाला भीषण अपघात

२ जूनच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ७ वाजून १० मिनिटांनी कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे घसरले. बंगळुरु हावडा एक्स्प्रेने या एक्स्प्रेसला धडक दिली. तसंच ही गाडी आधीच एका मालगाडीला धडकली होती. सुमारे ५१ तासांनी या ठिकाणाची वाहतूक पूर्ववत झाली आहे. आता या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होते आहे.