Premium

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार, अदाणी समूहाची घोषणा

ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीला धावून आला अदाणी समूह.

Gautam Adani helps Odisha Train Accident
गौतम अदानी – ओडिशा रेल्वे दुर्घटना

ओदिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २८८ वर गेली आहे, तर जखमींची संख्या १,००० च्याही पुढे गेली आहे. या अपघातानंतर बालासोर जिल्हा रुग्णालय आणि सोरो रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमींना दाखल करण्यात आलं आहे. तसेच जखमी रुग्णांनी रुग्णालयाच्या खोल्या आणि आवारही भरून गेला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक जखमी प्रवाशांना मदत करण्याचा अथक प्रयत्न करत आहे. एकीकडे सरकार या घटनेचा तपास करत आहे, तर दुसऱ्या बाजूला दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. देशातले प्रसिद्ध व्यावसायिक गौतम अदाणीदेखील मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मृत प्रवाशांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च अदाणी समूह करणार असल्याची माहिती देणारं ट्वीट गौतम अदाणी यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदाणी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आपण सर्वजण व्यथित झालो आहोत. या दुर्घटनेत ज्या लहान मुलांचे आई-वडील दगावले आहेत, त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदाणी समूह घेईल, असं आम्ही ठरवलं आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणं आणि त्यांच्या मुलांना चांगलं भविष्य देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

हे ही वाचा >> Odisha Train Accident : कसा झाला अपघात? कारण काय? रेल्वे विभागाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

कोरोमंडल एक्स्प्रेस काल (०३ जून) जेव्हा बहनगा स्थानकाजवळ आली तेव्हा अप मार्गिकेला समांतर लूप लाइनवर मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गिकेवरून पुढे जाणं अपेक्षित होते. परंतु तसं घडलं नाही. कोरोमंडल एक्स्प्रेस अप मुख्य मार्गिका सोडून लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला मागच्या बाजूने धडकली. तब्बल १२८ किमी प्रति तास इतक्या वेगाने येणारी कोरोमंडल एक्सप्रेसचं इंजिन आणि त्यापाठचे काही डबे मालगाडीवर चढले. सिग्नल यंत्रणेतील त्रुटींमुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odisha train accident gautam adani says will take responsibility to educate orphaned kids asc

First published on: 04-06-2023 at 19:24 IST
Next Story
Odisha Train Accident: रेल्वे अधिकाऱ्यांकडून फेब्रुवारीमध्येच इशारा, म्हणाले होते…