ओडिशातील भीषण तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांची संघ्या २८८ वर पोहोचली आहे, तर जखमींची संख्या १,००० हून अधिक आहे. या दुर्घटनेला ३६ तासांनंतर या घटनेचं कारण समोर आलं आहे. या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांची माहिती मिळाली आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही वेळापूर्वी सांगितलं.

कोरोमंडल एक्स्प्रेस बहनगा स्थानकाजवळ आली तेव्हा अप मार्गिकेला समांतर लूप लाइनवर मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गिकेवरून पुढे जाणं अपेक्षित होतं. परंतु तसं घडलं नाही. कोरोमंडल एक्स्प्रेस अप मुख्य मार्गिका सोडून लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला मागच्या बाजूने धडकली. मालगाडीवर कोरोमंडलचे इंजिन चढल्याचं दृश्य दुर्घटनास्थळी होते. सिग्नल यंत्रणेतील त्रुटींमुळे अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी सांगितलं गेलं.

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, आज संध्याकाळपर्यंत रेल्वे रूळ पूर्ववत होतील. या अपघाताचं मुख्य कारण शोधण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घटनास्थळाची पाहणी केली. आम्ही आज रात्रीपर्यंत रेल्वे रूळ पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून या मार्गावर रेल्वेसेवा सुरळीत होईल. तसेच सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

भारतीय वायू सेनेने स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या सहय्याने मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी एमआय-१७ हेलिकॉप्टर तैनात केलं आहे. रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा तसेच इतर दुरुस्तीच्या कामासाठी १,००० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच सातपेक्षा जास्त पोकलेन मशीन, अपघातात मदत करणारी दोन वाहनं तीन ते चार रेल्वे गाड्या आणि रोड क्रेन तैनात करण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Odisha Train Accident : सुट्टीवर जाणाऱ्या NDRF च्या जवानाने पाठवला अपघाताचा पहिला अलर्ट, त्यानंतर प्रवाशांना केली मोलाची मदत

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून अपघाताचं कारण स्पष्ट झालं आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणारे लोक कोण आहेत ते देखील स्पष्ट झालं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलांमुळे ही दुर्घटना झाली.