Premium

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघाताचं कारण स्पष्ट, चौकशी पूर्ण होताच रेल्वेमंत्री म्हणाले…

ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले.

Ashwini Vaishnav
कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात (PC : ANI)

ओडिशातील भीषण तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांची संघ्या २८८ वर पोहोचली आहे, तर जखमींची संख्या १,००० हून अधिक आहे. या दुर्घटनेला ३६ तासांनंतर या घटनेचं कारण समोर आलं आहे. या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांची माहिती मिळाली आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही वेळापूर्वी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरोमंडल एक्स्प्रेस बहनगा स्थानकाजवळ आली तेव्हा अप मार्गिकेला समांतर लूप लाइनवर मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गिकेवरून पुढे जाणं अपेक्षित होतं. परंतु तसं घडलं नाही. कोरोमंडल एक्स्प्रेस अप मुख्य मार्गिका सोडून लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला मागच्या बाजूने धडकली. मालगाडीवर कोरोमंडलचे इंजिन चढल्याचं दृश्य दुर्घटनास्थळी होते. सिग्नल यंत्रणेतील त्रुटींमुळे अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी सांगितलं गेलं.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, आज संध्याकाळपर्यंत रेल्वे रूळ पूर्ववत होतील. या अपघाताचं मुख्य कारण शोधण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घटनास्थळाची पाहणी केली. आम्ही आज रात्रीपर्यंत रेल्वे रूळ पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून या मार्गावर रेल्वेसेवा सुरळीत होईल. तसेच सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

भारतीय वायू सेनेने स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या सहय्याने मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी एमआय-१७ हेलिकॉप्टर तैनात केलं आहे. रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा तसेच इतर दुरुस्तीच्या कामासाठी १,००० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच सातपेक्षा जास्त पोकलेन मशीन, अपघातात मदत करणारी दोन वाहनं तीन ते चार रेल्वे गाड्या आणि रोड क्रेन तैनात करण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Odisha Train Accident : सुट्टीवर जाणाऱ्या NDRF च्या जवानाने पाठवला अपघाताचा पहिला अलर्ट, त्यानंतर प्रवाशांना केली मोलाची मदत

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून अपघाताचं कारण स्पष्ट झालं आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणारे लोक कोण आहेत ते देखील स्पष्ट झालं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलांमुळे ही दुर्घटना झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odisha train accident reason exposed railway minister ashwini vaishnav said responsible identified asc