कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) ने लिंगनमक्की धरणातून सुमारे ५०० क्युसेक पाणी सोडले जेणेकरून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग फॉल्स धबधबा पाहता यावा. अधिकाऱ्यांनी यासाठी कोणाचीही परवानगी न घेतली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला आहे.

कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल थावरचंद गहलोत हे शरावती नदीवर १५१ टीएमसी क्षमतेचे मोठे धरण आहे. या घरणाच्या जवळपास प्रसिद्ध ‘जोग फॉल्स’ हा धबधबा आहे. हा धबधबा पाहायला राज्यपाल जाणार होते. राज्यपालांना धबधबा वेगाने वाहतांना पाहता यावा यासाठी अधिकाऱ्यांनी मनमानी करत नदीकाठच्या लोकांना कुठलीही पूर्व कल्पना न देता राज्यपाल येण्यापूर्वी शरावती नदीमध्ये पाणी सोडले. मात्र, धबधब्यापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच राज्यपाल काही मनिटातच तेथून निघून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी केलाडी शिवप्पा नायक कृषी आणि फलोत्पादन विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी गहलोत बुधवारी शिवमोग्गा येथे गेले होते. जोग येथील इंस्पेक्शन बंगल्यात त्यांनी रात्रभर मुक्काम केला, ज्याला ब्रिटिश बंगला म्हटले जाते, जो फॉल्सच्या जवळ आहे.

दरम्यान, योग्य प्रक्रिया न करता पाणी सोडल्याबद्दल अधिकाऱ्यांची आता चौकशी करण्यात येत आहे. कारण अचानक पाणी सोडल्यामुळे नदीकाठी राहणारे लोक धोक्यात आले असते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials release water from dam for governor to see jog falls in full glory karnataka srk
First published on: 27-11-2021 at 18:05 IST