दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतातही पाच वर्षाखालील मुलांना Omicron चा धोका?; तज्ज्ञ म्हणतात,…

दास यांनी सावध राहण्याचा आणि घाबरुन न जाण्याचा सल्ला देशवासियांना दिला आहे.

mother of 328 children in Raigad died due to corona

करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्या जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतल्या लहान मुलांनाही या विषाणूची लागण होत असल्याने इतर देशांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, अशातच भारतातल्या संशोधकांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. ज्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतल्या बालकांना ओमायक्रॉनची लागण होत आहे, तशा पद्धतीने भारतासह इतर देशातल्या बालकांना होणार नाही, असा दावा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. सुमित्रा दास यांनी केला आहे.

आत्तापर्यंत आलेल्या करोनाच्या लाटांमध्ये जगभरातल्या लहान मुलांना गंभीररित्या करोनाची लागण झालेली नव्हती. मात्र ओमायक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेतल्या पाच वर्षांखालील मुलांना लागण होण्याचं प्रमाण चिंताजनक आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज या संस्थेने सांगितलं की, ओमायक्रॉनची लागण सर्वच वयोगटातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र पाच वर्षांखालील मुलांमध्ये बाधित होण्याचं प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा – Omicron: लहान मुलांमधील संसर्ग वाढला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या ० ते ५ वयोगटातील रुग्णसंख्येत वाढ

मात्र बायोमेडिकल जिनोमिक्ससाठीच्या राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ. सुमित्रा दास यांचं म्हणणं आहे की, दक्षिण आफ्रिकेत ज्या प्रमाणे पाच वर्षांखालील मुलांना ओमायक्रॉनची लागण होत आहे, तशाच पद्धतीने भारतातल्या बालकांनाही होईल असं गृहीत धरणं सध्या योग्य नाही. हे खूपच लवकर होईल. पश्चिम बंगालमध्ये असलेली ही संस्था देशातल्या जनुकीय संरचनेचा अभ्यास करणाऱ्या २८ प्रयोगशाळांपैकी एक आहे.

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. दास यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, आपल्याला हे विचारात घ्यायला हवं की प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, आहारविहाराच्या सवयी, याआधी झालेल्या संसर्गाच्या अनुषंगाने तयार झालेली प्रतिकार शक्ती या सगळ्या गोष्टी नव्या विषाणू संसर्गासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीयांची विषाणू संसर्गांचा सामना करण्याची शक्ती ही इतर देशातल्या नागरिकांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे इतर देशात ज्याप्रमाणे संसर्ग झाला आहे, तशाच पद्धतीने भारतातही होईल असं अनुमान लावता येणार नाही.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ” यासंदर्भातल्या प्रश्नांची निश्चित उत्तरे येत्या आठवड्यातच स्पष्ट होतील”. दास यांनी सावध राहण्याचा आणि घाबरुन न जाण्याचा सल्ला देशवासियांना दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Omicron may not infect kids in india the way it is infecting south african children says insacog member vsk