भरधाव वेगात आलेल्या एका कारने साह वाहनांना धडक दिली आणि त्यातला बाईकर हा हवेत उडाला. तर एका ई रिक्षाचंही बरंच नुकसान झालं. हा सगळा प्रकार पंजाबमधील लुधियाना या ठिकाणी असलेल्या के बहादुरके रोड या ठिकाणी घडला. टाटा टियागो EV या कराने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. ज्यात अॅक्टिव्हा स्कूटर, मोटरसायकल आणि एक सायकल, दोन ई रिक्षा यांचा समावेश होता. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

अपघातात पाच लोक जखमी

टाटा टियागो ईव्ही कारने सहा वाहनांना जी धडक दिली त्यानंतर या घटनेत पाचजण जखणी झाले आहेत. या सगळ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा भयंकर अपघात २४ सप्टेंबरला झाला आहे. जे फुटेज दिसतं आहे त्यानुसार बहादुरके रोड या ठिकाणी वाहतूक अपघाताच्या आधी अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू होती हे दिसतं आहे. अचानक टाटा टियागो ही कार येते. त्यानंतर ती सहा वाहनांना जोरदार धडक देते ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.

टाटा टियागोच्या धडकेमुळे बाईकर हवेत उडाला

धडक इतकी जोरदार होती बाईकर हवेत उडाला. हे देखील या फुटेजमध्ये दिसून येतं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात धडक बसल्यानंतर बायकर साधारण हवेत उडाला आणि ३० फूट लांब जाऊन पडला. त्यानंतर ही कार आणखी भरधाव वेगात पुढे गेली. त्यानंतर या कारने दोन ई रिक्षा आणि एका अॅक्टिवाहाला जोरदार धडक दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. अपघातात धडक लागल्याने रिक्षांचाही तोल गेला हे देखील या फुटेजमध्ये दिसतं आहे.

चालकाने मद्यपान केलं होतं?

जतिंदर पाल सिंग या ई रिक्षा ड्रायव्हरसह एकूण पाचजण जखमी झाले आहेत. जतिंदर पाल सिंग यांनी हे सांगितलं की कारचा स्पीड हा ताशी १०० ते १२० किमी असावा. जतिंदर पाल सिंग म्हणाले की कारच्या चालकाने मद्यपान केलं असावं त्यामुळेच तो इतक्या भरधाव वेगात कार चालवत असा संशय व्यक्त केला आहे. सालेम टाबरी पोलिसांनी ही माहिती दिली की अपघाताची माहिती मिळताच आम्ही घटना स्थळी पोहचलो आहोत आणि चालकाला आम्ही ताब्यात घेतलं आहे. आता त्याची चौकशीही करण्यात येत आहे.