१४ जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे. या निमित्ताने एक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात १ कोटींपेक्षा जास्त लोक योगासन करताना दिसतील, अशी आशा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवांतर्गत १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालयाने सर्व तयारी केली आहे, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे सिद्ध सत्य आहे की सूर्यनमस्कारामुळे चैतन्य आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि त्यामुळे करोनाला दूर ठेवता येते. आम्ही या कार्यक्रमात ७५ लाख लोक सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु नोंदणी आणि आमची तयारी पाहता, हा आकडा १ कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आयुष मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू केला आहे,” असं सोनोवाल यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On makar sankranti 2022 more than 1 crore people will perform surya namaskar says sarbananda sonowal hrc
First published on: 13-01-2022 at 15:27 IST