जम्मू : जम्मू भागातील उधमपूर शहरातील जिल्हा न्यायालय परिसराबाहेर बुधवारी झालेल्या आयईडी स्फोटात एक जण ठार, तर १४ जण जखमी झाले. ‘हे दहशतवादी कृत्य असल्याचे प्राथमिक तपासातून दिसते, मात्र आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत,’ असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले.

हा स्फोट फळे व भाज्या विक्रेते त्यांच्या गाडय़ा उभ्या करत असलेल्या स्लाथिया चौकात दुपारी १ वाजताच्या सुमारास झाला.  अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी इतर उच्चपदस्थ पोलीस अधिकारी, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व बॉम्बनाशक तज्ज्ञ यांच्यासह स्फोट झालेल्या ठिकाणाला भेट दिल्याचेही पोलीस महासंचालकांनी सांगितले.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

‘या स्फोटासाठी कमी तीव्रतेच्या स्फोटक उपकरणाचा (आयईडी) वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले, मात्र न्यायवैद्यक आणि सूक्ष्म तपासणीनंतरच वस्तुस्थिती उघड होईल, असे दिलबाग सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

आसाममध्ये भाजपचा मोठा विजय

आसामधील ८० पैकी ७३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. सायंकाळपर्यंत काँग्रेसला एकाही ठीकाणी बहुमत मिळाले नव्हते. पाच पालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपने ६७२ प्रभागांमध्ये तर काँग्रेसला ७१ ठिकाणी विजय मिळवता आला. इतरांना १४९ प्रभाग जिंकता आले. यापूर्वीच ५७ प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. विकासाच्या बाजूने जनतेने प्रचंड कौल दिला आहे अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हेमंतबिस्व सरमा यांनी दिली आहे. तर राज्याला पक्षाला अधिक मेहनत घ्यावी लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बाऊआ यांनी नमूद केले. ८० पालिका मंडळांसाठी ६ मार्च रोजी मतदान झाले होते.