scorecardresearch

Premium

दहशतवादी हल्ला : श्रीनगरमध्ये पोलीस टीमवर गोळीबार; एक जवान जखमी

दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे

दहशतवादी हल्ला : श्रीनगरमध्ये पोलीस टीमवर गोळीबार; एक जवान जखमी

श्रीनगरमधील खानयार भागात आज पोलीस टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या जवानांच्या छातीवर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. तर, जखमी जवानाला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी  श्रीनगरमधील छानापोरा भागात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता.

जम्मू-काश्मीर : जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला!

त्या अगोदर भारतीय लष्कराने जम्मू -काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. पहाटे लष्कराला नियंत्रण रेषेजवळ तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट दिसला. त्यांच्यापैकी एक जण सीमा ओलांडून भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात तो घुसखोर ठार झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2021 at 15:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×