Operation Sindoor Pakistan Air Force losses 20 percent infra : पहलगाममध्ये झालेल्या दहतवाद्यांनी केलेल्या हल्यानंतर भारतीय वायूदलाने या दहशतवादी संघटनांविरोधात मोठी मोहीम आखली होती. भारतीय वायूदलाने पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्रे डांगली, या तळांवर बॉम्बवर्षाव केला. भारतीय वायूदलाने केलेलया या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी वायू दलाच्या पायाभूत सुविधांचा तब्बल २० टक्के भाग नुकसानग्रस्त झाला आहे. पाकिस्तानी वायू दलाची अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. भारतीय संरक्षण विभागातील अधिकृत सूत्रांनी मंगळवारी याबाबतची माहिती जाहीर केली.
सूत्रांनी सांगितले की आधी पाकिस्तानने सशस्त्र ड्रोन हल्ले केले. तसेच भारतीय लष्करी तळांवर व नागरी परिसरावर क्षेपणास्रे डांगली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने सरगोथा व भोलारीसारख्या पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केलं येथील दारुगोळा साठवून ठेवलेल्या तळांवरही हल्ले केले. या भागात पाकिस्ताने वायूदलातील एफ-१६ व जे-१७ ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती. भारताच्या हल्ल्यात हीलढाऊ विमाने नुकसाग्रस्त झाली आहेत.
पाकिस्तानी वायूदलाचं प्रचंड नुकसान
सिंध प्रांतातील जामशोरो जिल्ह्यातील भोलारी येथील पाकिस्तानी वायू दलाच्या तळावर मोठा हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात स्वाड्रन लीडर उस्मान युसूफ व हवाई दलाच्या इतर चार जवानांसह ५० हून अधिक लोक ठार झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात पीएएफची अनेक लढाऊ विमाने नुकसानग्रस्त झाली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
पाकिस्तानी वायूदलातील अधिकारी ठार
सिंध प्रांतातील जामशोरो जिल्ह्यातील भोलारी येथील पाकिस्तानी वायू दलाच्या तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यात स्वाड्रन लीडर उस्मान युसूफ आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या इतर चार जवानांसह ५० हून अधिक लोक ठार झाले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यात पीएएफची अनेक लढाऊ विमाने नुकसानग्रस्त झाली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. जॅकबाबाद येथील वायू दलाच्या तळावर भारताकडून हवाई हल्ले करण्यापूर्वीचे व हवाई हल्ल्यानंतरचे उपग्रहाच्या मदतीने टिपलेले फोटो समोर आले असून भारतीय वायू दलाने अचूक वेध घेतल्याचं दिसत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी वायू दलाचं प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.
भारतीय लष्करी कमांडर्सनी यापूर्वी माहिती दिली होती की नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीवेळी भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी लष्करातील ३५-४० जवान मृत्यूमुखी पडले. तसेच पाकिस्तानी हवाई दलाची काही विमाने उद्ध्वस्त झाली आहेत.