scorecardresearch

Queen Elizabeth II Death: महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू, वाचा अंत्यविधीचे नियोजन कसे असणार

Operation Unicorn: महाराणी यांच्या मृत्यूनंतर स्कॉटलंडमध्ये लाखो लोक जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

Britain Queen Elizabeth Death
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन

Britain Queen Elizabeth II Passes Away: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीच्या नियोजनासाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू करण्यात आले आहे. ब्रिटनचे राजे किंवा महाराणी यांचा मृत्यू लंडनऐवजी स्कॉटलंडमध्ये झाल्यास राज्यघटनेत ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन

‘ऑपरेशन युनिकॉर्न’ हा शब्द एडिनबर्ग संसदेच्या ऑनलाईन पेपर्समध्ये २०१७ साली पहिल्यांदा वापरण्यात आला, असे वृत्त ‘द हेरॉल्ड’ या वृत्तपत्राने दिले आहे. “महाराणीचा मृत्यू स्कॉटलंडमध्ये झाल्यामुळे येथील संसद भवन, ‘होलीरुड हाऊस’ हा राजवाडा आणि ‘सेंट गील्स कॅथेड्रॉल’ ही महत्त्वाची ठिकाणे असतील”, अशी माहिती या वृत्तपत्राने दिली आहे. ‘होलीरुड हाऊस’ हा राजवाडा महाराणी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तर कॅथेड्रॉल चर्च स्कॉटलंडच्या राजधानीतील प्राचीन मध्ययुगीन चर्चेपैकी एक आहे.

महाराणी यांच्या मृत्यनंतर संसदीय कामकाज तहकूब करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांकडून शोक प्रस्ताव तयार करण्यात येत असून महाराणी यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात येत आहे. ब्रिटनमधील खासदारांकडून संसदेतील शोकपुस्तिकेवर स्वाक्षऱ्या करण्यात येत आहेत. महाराणी यांच्या मृत्यूनंतर स्कॉटलंडमध्ये लाखो लोक जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, महाराणी यांचे पार्थिव एडिनबर्ग येथील वेवरली स्थानकातील एका शाही रेल्वेमध्ये ठेवण्यात येणार आहे. या रेल्वेतूनच लंडनच्या दिशेने महाराणी शेवटचा प्रवास करणार आहेत.

राणी एलिझाबेथ कालवश ; ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात

युनिकॉर्न अर्थात घोडा हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी आहे. ब्रिटनच्या शाही राजघराण्यातील सिंहाप्रमाणेच या प्राण्याला महत्त्वाचे स्थान आहे. दरम्यान, महाराणी यांच्या मृत्यूनंतर ऑपरेशन ‘लंडन ब्रीज’देखील सुरू करण्यात आले आहे. यानुसार ‘बीबीसी’ या वृत्त वाहिनीचे निवेदक काळे कपडे परिधान करुन वृत्त निवेदन करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-09-2022 at 07:53 IST

संबंधित बातम्या