मादक पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्याच्या तालिबानच्या आश्वासनानंतरही अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती सुरूच

गेल्या वर्षभरात अफूची शेती ३७ टक्क्यांनी वाढली आहे आणि देशभरातील उत्पन्नाचा तो प्रमुख स्रोत आहे.

Opium cultivation continues in Afghanistan despite Taliban promises to curb drug trade
(फोटो सौजन्य- REUTERS/Abdul Malik)

अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांच्या व्यापाराचे उच्चाटन करण्याच्या आणि अफूच्या उत्पादनावर बंदी घालण्याच्या तालिबानच्या हालचालींना अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. अफूचा सर्वात मोठा उत्पादक देश असल्याने आणि पर्यायी उपजीविकेचा अभाव असल्याने, तालिबानच्या इशाऱ्याला न जुमानता शेतकरी अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती करत आहेत.

अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेशी अफूचा अवैध व्यापार जोडला गेला आहे. अफूच्या उत्पादनामुळे अफगाणिस्तानला मिळणारे  परदेशातील मदत विस्कळीत होण्याचा धोका आहे, जी तालिबानने देश ताब्यात घेतल्यापासून मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

१५ ऑगस्ट रोजी सत्तेवर आल्यानंतर लगेचच तालिबानचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद म्हणाले होते की, नवीन सरकार देशात अंमली पदार्थांच्या व्यापाराला परवानगी देणार नाही. “आम्ही अमली पदार्थांच्या विरोधात आहोत आणि अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात अंमली पदार्थांचे उत्पादन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा संपूर्ण जग शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यात आणि त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल,” असे जबिउल्ला मुजाहिद म्हणाले होते.

एका अफगाण शेतकऱ्याने अल्जझीराला सांगितले की, “आम्ही खसखस पिकवतो जेणेकरून आम्ही कुटुंबासाठी भाकरी विकत घेऊ शकू. कोणत्याही सरकारने आम्हाला मदत केली नाही. आमच्याकडे इतर पिकांसाठी पुरेसे पाणी नाही, त्यामुळे खसखस हा एकमेव उपलब्ध पर्याय आहे.”

गेल्या वर्षभरात अफूची शेती ३७ टक्क्यांनी वाढली आहे आणि देशभरातील उत्पन्नाचा तो प्रमुख स्रोत आहे. वनस्पती आणि त्यातून निर्माण होणारी औषधे हा कोट्यवधी डॉलरचा उद्योग आहे. युनायटेड नेशन्सच्या मते, अफूच्या कापणीने २०१९ मध्ये १,२०,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मादक पदार्थांचा सामना करण्याच्या प्रयत्नात, तालिबानने लोकांना पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे.

बंडखोरीच्या काळात, तालिबानने तस्करांवर कर लावून व्यापारातून नफा कमावला. ही पद्धत त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्षेत्रांतील विविध प्रकारच्या उद्योगांना लागू करण्यात आली आहे. डेव्हिड मॅन्सफिल्ड, अफगाण मादक पदार्थांच्या व्यापारातील तज्ञ, यांनी केलेल्या संशोधनानुसार, या व्यापारातून २०२० मध्ये २० दशलक्ष कमावले, जे कर संकलनातून उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांच्या तुलनेत एक लहान अंश आहे. सार्वजनिकरित्या, त्यांनी नेहमीच या व्यापाराशी संबंध नाकारला आहे.

पण तालिबानने अमेरिकेच्या आक्रमणापूर्वी २०००-२००१ दरम्यान अफूच्या उत्पादनावरील एकमेव मोठ्या प्रमाणात यशस्वी बंदी लागू केली. एकामागोमाग आलेली सरकारे हे करण्यात अपयशी ठरली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Opium cultivation continues in afghanistan despite taliban promises to curb drug trade abn