स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर एका सरकारी शाळेत अफू (Opium ) आणि पोपीचे (Poppy) वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील गुडमालानी गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – दलित विद्यार्थी मारहाण प्रकरण : मेघवाल कुटुंबियांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा भीम आर्मीचा आरोप; पाण्याच्या टाकीवर चढत केले आंदोलन

शिक्षणाधिकारी ओमप्रकाश विश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या गुडमालानी भागातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर काही लोक शाळेत पोहोचले होते. ते एकमेकांना अफू देत होते. या घटनेची माहिती मिळताच ते शाळेत पोहोचलो. मात्र, तोपर्यंत तिथे कोणीही नव्हतं. या घटनेची चौकशी सुरू असून आम्ही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – “स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशात…,” दलित विद्यार्थ्याच्या हत्येनंतर मीरा कुमार यांचा संताप, वडिलांचीही सांगितली आठवण

पोपी (Poppy) ​​ही फुलांची वनस्पती आहे. त्याच्या रोपातून अफू काढली जाते. अफूची लागवड आणि व्यापार करण्यासाठी सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. वाळलेल्या पोपीपासून मॉर्फिन आणि कोडीन काढले जातात, जे अनेक औषधांमध्ये वापरले जातात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opium served in government school at badmer district in rajasthan spb
First published on: 16-08-2022 at 15:17 IST