लॉकडाउनचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारला छापा; घरात ५० जण करत होते Sex Party

कॉलगर्ल्स आणि देहविक्री करणारे पुरुषही या पार्टीमध्ये होते

फाइल फोटो

युरोपातील इतर देशांप्रमाणेच बेल्जियममध्येही करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर देशामध्ये नाईट कर्फ्यू आणि क्वारंटाइनसंदर्भातील नियम पुन्हा लागू करण्यात आले असून त्यांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यासंदर्भात देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. असं असतानाच देशाची राजधानी असणाऱ्या ब्रसेल्समध्ये शनिवारी पोलिसांकडे एका ठिकाणी वाढदिवसाची पार्टी सुरु असून येथे नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आली. पोलिसांनी मिळालेल्य माहितीनुसार घरावर छापा टाकला असला समोरचे दृष्य पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. करोनासंदर्भातील सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करण्यात आलेले असतानाच या घरामध्ये एकाच वेळी ५० जण सामूहिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवताना आढळून आले.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या घरातील सर्व व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांची आधी करोना चाचणी करण्यात आली. ही घटना बेल्जियमच्या व्हिक्टोन प्रांतामध्ये सेंट मार्ड नावाच्या गावामध्ये घडली आहे. पोलिसांना या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या रुग्णालयामधून फोन करण्यात आला होता. रुग्णालय प्रशासनाने जवळच्या एका घरामध्ये मोठ्याने गाणी वाजत असून अनेकजण तिथे एकत्र जमा झाले आहेत अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी हा छापा टाकला होता. यापूर्वी ४ डिसेंबर रोजी ब्रसेल्समध्ये हंगेरीच्या एका खासदारालाही ऑल मेल सेक्स पार्टीमध्ये सहभागी झालेला असतानाच अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे घर एका २८ वर्षीय फ्रेंच महिलेच्या मालकीचे आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा येथे एका वाढदिवसाची पार्टी सुरु होती. या महिलेने पोलिसांना वाढदिवसासाठी २० पाहुणे येतील अशी माहिती आधीच देऊन ठेवली होती. मात्र पोलिसांनी धाड टाकली तेव्हा घरात ५० हून अधिक माणसं होती. यापैकी अनेकजण हे नग्नावस्थेतच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरात उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ड्रग्सचे सेवन करण्याबरोबरच सामूहिक सेक्सही करताना आढळून आले. अटक करण्यात आलेले बहुतेक सर्वचजण फ्रेंच नागरिक आहेत.

घरातील या पार्टीसाठी कॉलगर्ल्स आणि देहविक्री करणाऱ्या पुरुषांनाही बोलवण्यात आलेलं. पोलिसांना या घरामध्ये अंमली पदार्थही सापडले आहेत. जवळच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या घराच्या खिडक्यांमधून घरामध्ये फिरणार नग्न व्यक्ती दिसत होता. त्यामुळेच यासंदर्भात फोन करुन रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Orgy with 50 naked people including prostitutes becomes latest belgian sex party raid in belgiam scsg