‘ओआरओपी’साठी मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्याच्या मुलीचे आंदोलन

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेले माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांची मुलीगी सैनिकांच्या आंदोलनात सहभागी झाली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेले माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांची मुलीगी सैनिकांच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. वन रँक वन पेंशन (ओआरओपी) मागणीला परराष्ट्र राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही.के.सिंह यांची मुलगी मृणालिनी सिंह यांनीही पाठींबा दिला आहे.
आंदोलनातील सहभागाबाबत बोलताना मृणालिनी म्हणाली, ‘मी माजी सैनिकाची मुलगी आहे. म्हणूनच या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले आहे. ‘वन रँक, वन पेन्शन’ लवकरात लवकर लागू व्हावी असं माझं मत आहे.’
लोकसभा निवडणुकीवेळी हरियाणामध्ये नरेंद्र मोदींनी व्ही.के.सिंहाच्यासोबत माजी सैनिकांच्या मेळाव्यात भाजपची सत्ता आल्यानंतर वन रँक वन पेंशन योजना प्रत्यक्षात आणू असे आश्वासन दिले होते. सरकारला एक वर्षे झाले आहे मात्र अद्याप या मागणीचा विचार झालेला नाही. तसेचस, नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदी यांनी पुढची तारीख दिल्याने माजी सैनिकांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. आज व्ही. के. सिंग यांची मुलगी मृणालिनी आंदोलनात उतरल्याने या संघर्षाला अधिकच धार आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Orop demand union minister vk singhs daughter joins protest at jantar mantar