UP Election 2022 : एमआयएमचा मोठा निर्णय ; खासदार ओवेसींनी केली घोषणा, म्हणाले…

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

AIMIM chief Asaduddin Owaisi on UP Election
(संग्रहीत छायाचित्र)

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत एमआयएम १०० जागा लढवणार असल्याची घोषणा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख व खासदार यांनी केली आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून उत्तर प्रदेश निवडणूक एमआयएम लढवणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. शिवाय ओवेसींनी विविध राजकीय पक्षांशी चर्चा देखील केली होती. अखेर आता ओवेसींनी स्वतः याबाबत घोषणा केली. याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले की ते आघाडीसाठी देखील प्रयत्न करत आहेत.

ओवेसींनी सांगितले की, आमच्या पक्षाने या निवडणुकीत १०० जागा लढवण्याचे ठरवले आहे. आम्ही एक-दोन पक्षांशी आघाडीबाबत चर्चा देखील करत आहोत. आघाडी होईल की नाही हे आगामी काळात समजेलच. आम्ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Our party has decided to contest elections on 100 seats aimim chief asaduddin owaisi on up assembly elections msr

ताज्या बातम्या