नवी दिल्ली : संपूर्ण भारतात १ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत ९ हजार ६०० हून अधिक लहान मुले प्रौढ तुरुंगात चुकीच्या पद्धतीने कैद केल्याचे भीषण वास्तव अभ्यासातून समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय़) ‘भारतातील कारागृहांत मुलांची कैद’ या अभ्यासाअंतर्गत ही माहिती मिळवण्यात आली. कायदेशीर अधिकार संस्था असलेल्या ‘आयप्रोबोनो’ने केलेल्या अभ्यासातून भारतातील बाल न्याय व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या गंभीर बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हेही वाचा >>> देशातील १३ विमानतळे बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ईमेल प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तैनात!

delay , RTE, admission,
आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत, शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप
86 percent of the employees struggle
८६ टक्के कर्मचाऱ्यांचा नोकरीत संघर्ष, नाखुश तरीही करतायत प्रामाणिकपणे काम
Transfers, ST employees, ST,
एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता एका ‘क्लिक’वर, गैरप्रकाराला…
neet row 63 unfair cases reported no paper leak says nta
‘नीट-यूजी’चे पावित्र्य अबाधितच! एनटीए अधिकाऱ्यांचा दावा; परीक्षेत केवळ ६३ गैरप्रकार झाल्याची माहिती
bjp nana patole, nana patole on neet students
भाजपने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यावरून नाना पटोलेंची टीका, निकालाचे फेरमूल्यांकन करा
memory chip Intel logic chip Pat Gelsin Andy Grove
चिप-चरित्र: धाडसी निर्णयाची फलश्रुती
private schools association move high court for admissions protection made after amendment in rte act
आरटीई कायद्यातील दुरुस्तीनंतर दिलेल्या प्रवेशांना संरक्षण द्या; खासगी शाळांच्या संघटनेची उच्च न्यायालयात धाव
bribe of three lakhs was paid on name of the chief officer of MHADA
धक्कादायक! म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर पावणेतीन लाखांची लाच

देशातील किमान ९ हजार ६८१ मुलांना कारागृहात चुकीच्या पद्धतीने कैद करण्यात आले. याचाच अर्थ सरासरी १ हजार ६०० हून अधिक मुले दरवर्षी कारागृहात कैद केली जातात. बाल न्याय मंडळाद्वारे (जेजेबी) ओळखल्या गेलेल्या आणि प्रौढ तुरुंगातून बालगृहात हलविलेल्या मुलांचा संदर्भ घेऊन ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशभरातील एकूण ५७० पैकी २८५ जिल्हा आणि मध्यवर्ती कारागृहांनी ‘आरटीआय’द्वारे दिलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी निश्चित केली आहे. देशभरातील ७४९ तुरुंग अशी आहेत ज्यांमधून माहिती मागवलेली नाही. यामध्ये उप कारागृह, महिला कारागृह, खुली कारागृहे, विशेष कारागृहे, बालसुधारगृह आणि इतर कारागृहांचा समावेश आहे. तर ९ हजार ६८१ मध्ये केवळ यशस्वीरीत्या ओळखल्या गेलेल्या आणि हस्तांतरित झालेल्या, तुरुंगातील अभ्यागतांनी, कुटुंबांनी किंवा स्वत:ची ओळख करून घेतलेल्या मुलांचा यामध्ये समावेश आहे. तसेच कथित गुन्ह्याच्या वेळी जे अल्पवयीन होते, त्या सर्वांचाच यामध्ये समावेश नाही. ज्या राज्यांनी माहिती दिली तेथील आकडेवारीही चिंताजनक आहे.

कारागृहांचा आढावा…

राज्य कारागृह प्रौढ तुरुंगातून प्रतिसाद मुलांचे स्थलांतर

उत्तर प्रदेश       ७१ टक्के २,९१४

बिहार           ३४ टक्के १,५१८

महाराष्ट्र          ३५ टक्के ३४

हरियाणा         ९० टक्के १,६२१

राजस्थान        ५१ टक्के १०८

छत्तीसगड        ४४ टक्के १५९

झारखंड         ६० टक्के १,११५