एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच मोठा दावा केला आहे. ७ मार्च किंवा १० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सरकार या मागे युक्रेन-रशिया युद्धाचं कारण पुढे करणार आहे. कारण त्यांचे लोक तर मोठ-मोठ्या बढाया मारत असतात. असंही ओवेसींनी बोलून दाखवलं. एवढंच नाही तर एका निवडणूक रॅलीत ओवेसींनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यकर्त्यांना उद्देशून याच मुद्द्यावर प्रश्न केला की, मोदी तुमच्या गाडीत पेट्रोल टाकतात का?

“पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की ७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चच्या सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे भाव वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये असं घडलय, तसं घडलय…काहीपण बोलतात. कारणं तयार करतात की असं घडलं, तसं घडलं आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं. तुमच्या गाडीत पेट्रोल मोदी टाकतोय, की गरीब स्वत:च्या पैशांनी गाडीत पेट्रोल भरतोय.” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

मोदी सरकारची “पोल ऑफर” संपणार आहे – राहुल गांधी

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला, ते म्हणाले की “लोकांनी त्यांच्या कारची टाकी भरली पाहिजे” कारण मोदी सरकारची “पोल ऑफर” संपणार आहे.”

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील दिलेले आहेत संकेत –

काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील एका निवडणूक प्रचारसभेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर आणखी परिणाम होऊ शकतो, असे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, “जर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुढे सरकले तर संकट आणखी गडद होईल. मी आधीच सांगतोय की संकट गंभीर होईल. तेल आणि गॅस रशियातून बहुतेक देशांमध्ये जातो.”