जेसिंथा सालढाणा या परिचारिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ऑस्ट्रेलियातील रेडिओ कर्मचाऱ्यांच्या खटय़ाळपणानंतर, आता त्या रेडिओ केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील २-डे एफएम रेडिओ केंद्रातील सुमारे १२ कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, तर या केंद्रातील १० अधिकाऱ्यांना खासगी सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. याशिवाय, रेडिओ केंद्र कार्यालयाभोवती तैनात कराव्या लागलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेमुळे रेडिओ केंद्राला दर आठवडय़ास ७५ हजार डॉलर्सचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.