scorecardresearch

‘बिसलरी’ कंपनीची विक्री होणार, नव्या मालकाविषयी सांगताना चेअरमन रमेश चौहान म्हणाले, “मला ते लोक…”

भारताची सर्वात मोठी ‘पॅकेज वॉटर कंपनी’ ‘बिसलरी’ची (Bisleri International) विक्री होणार आहे.

‘बिसलरी’ कंपनीची विक्री होणार, नव्या मालकाविषयी सांगताना चेअरमन रमेश चौहान म्हणाले, “मला ते लोक…”
बिसलरी

Tata Group-Bisleri Deal: भारताची सर्वात मोठी ‘पॅकेज वॉटर कंपनी’ ‘बिसलरी’ची (Bisleri International) विक्री होणार आहे. सॉफ्ट ड्रिंक ब्रँड थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का आंतरराष्ट्रीय कोका-कोला कंपनीला विकल्यानंतर ३० वर्षांनी आता कंपनीचे चेअरमन रमेश चौहान यांनी या नव्या निर्णयाची माहिती दिली. मागील दोन वर्षांपासून बिसलरी कंपनीच्या विक्रीबाबत चर्चा सुरू होती. बिसलरी कंपनी विकत घेण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. काही वृत्तपत्रांनी टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने बिसलरी कंपनी ७,००० कोटी रुपयांना खरेदी केल्याचं वृत्त दिलं. मात्र, चौहान यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

बिसलरीची विक्री का होत आहे?

माध्यमांमधील वृत्तानुसार, या व्यवहाराबाबत टाटा समुह आणि बिसलेरीच्या व्यवस्थापनाची मागील दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. यानंतर लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. ८२ वर्षाच्या रमेश चौहान यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून चांगली नाही. चौहान यांनी म्हटलं आहे की, बिसलेरीच्या विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी त्यांच्याकडे वारसदार नाही. त्यांची मुलगी जयंतीला या व्यवसायात रस नाही.

“टाटा सुमहावर विश्वास”

काही वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, चौहान म्हणाले, “मला टाटा समुहावर विश्वास आहे. टाटा समूह बिसलरीला आणखी पुढे घेऊन जाईल. मी अशा लोकांच्या शोधात होतो जे बिसलरीची काळजी घेतली. मी आणि कर्मचाऱ्यांनी बिसलरी कंपनीचा व्यवसाय खूप तन्मयतेने केला आहे. सीईओ एंजेलो जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखालील टीमला दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.”

बिसलरीची आर्थिक स्थिती काय?

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये बिसलरीचा व्यवसाय २२० कोटी रुपयांच्या नफ्यासह २,५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. बिसलरी हा मुळात इटालियन ब्रँड होता. त्यांनी भारतात १९६५ मध्ये मुंबईत स्थापना केली होती. चौहान यांनी १९६९ मध्ये बिसलरीची मालकी घेतली.

हेही वाचा : विश्लेषण : टाटा स्टीलची ‘मेगामर्जर’ योजना काय?

बिसलरी कंपनीचे एकूण १२२ ऑपरेशनल प्लँट आहेत आणि भारतासह शेजारी देशांमध्ये एकूण ४,५०० वितरक आहेत. वितरणासाठी कंपनीकडे एकूण ५,००० ट्रकचं नेटवर्क आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या