प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस म्हणजेच आज(२५ जानेवारी) २०२२ वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. तर, कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार –

प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका(मरणोत्तर)

पद्मभूषण पुरस्कार –

सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद

पद्मश्री पुरस्कार –

बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma awards 2022 announcement of padma awards on the eve of republic day msr
First published on: 25-01-2022 at 20:22 IST