प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण असे तीन पुरस्कार जाहीर केले जाण्याची प्रथा आहे. त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

कुणा कुणाला जाहीर झाले पद्म पुरस्कार?

१) डॉ. पुन्नियामूर्ती नटेसन – पद्मश्री

२) डॉ. श्याम सुंदर – पद्मश्री

३) गफरुद्दीन मेवारती- पद्मश्री

४) हॅली वॉर- पद्मश्री

५) इंद्रजीत सिंग सिद्धू- पद्मश्री

६) के पजनीवेल- पद्मश्री

७) कैलाशचंद्र पंत-पद्मश्री

८) खेमराज सुंदरियाल- पद्मश्री

९) कोलाक्कईल देवकी अम्मा- पद्मश्री

१०) महेंद्र कुमार मिश्रा- पद्मश्री

११) मीर हाजीभाई कासमभाई- पद्मश्री

१२) मोहन नागर- पद्मश्री

१३) नरेंद्र चंद्र देव वर्मा- पद्मश्री

१४) निलेश मांडलेवाला- पद्मश्री

१५) नुरुद्दीन अहमद- पद्मश्री

१६) ओथुवार थिरुथानी- पद्मश्री

१७) पोकिला लेकथेपी- पद्मश्री

१८) आर कृष्णन- पद्मश्री

१९) आर अँड एस गोडबोले – पद्मश्री

२०) रघुपत सिंग- पद्मश्री

२१) रघुवीर खेडकर- पद्मश्री

२२) राजस्थपती कल्लिअप्पा गोंडुर- पद्मश्री

२३) रामा रेड्डी ममिडी- पद्मश्री

२४) एस. जी. सुशीलअम्मा- पद्मश्री

२५) संग्युसंग एस पोंगनेर- पद्मश्री

२६) श्रीरंग लाड- पद्मश्री

२७) अर्मिडा फर्नांडीस-पद्मश्री

२८) भिकल्या लडक्या धिंडा-पद्मश्री

२९) अंके गौडा-पद्मश्री

भारतातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये होते पद्म पुरस्कारांची गणना

पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण अशा तीन प्रकारांमध्ये दिले जाणारे पुरस्कार हे भारतातले सर्वात मानाचे पुरस्कार समजले जातात. कला, समाजसेवा, जन प्रशासन, विज्ञान, व्यापार आणि उद्योग, साहित्य, शिक्षण क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसह विविध क्षेत्रांमध्ये उत्तम योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिले जातात.

महाराष्ट्रातली किती नावं?

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे श्रीरंग लाड यांनादेकील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यासह महाराष्ट्रातीलच भिकल्या लाडक्या धिंडा यांनादेखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.