Pahalgam Terror Attack India Pakistan Tensions Updates : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताकडून सुरू आहे. सिंधू जल कराराला स्थगिती, पाकिस्तानी नागरिकांची हद्दपारी आणि व्यापार निर्बंध घालून भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली. यानंतर पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देण्यात येत आहे. मात्र या धमक्यांना न जुमानता भारताने एक-एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे अनेक नेते आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखत देऊन पहलगाम हल्ल्यापासून हात झटकत असताना भारताने मात्र संयम ठेवून आपले निर्णय घेतले आहेत.

भारताकडून कोणती कारवाई करण्यात येत आहे, याबद्दल सर्व अपडेट्स येथे जाणून घेऊया…

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates 05 May 2025 | पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे लाईव्ह अपडेट्स

18:46 (IST) 5 May 2025

'नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करा', गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश

पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ता केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

17:59 (IST) 5 May 2025

पाकिस्तानला आर्थिक धक्का; तिसऱ्या देशांतून आयात केल्या जाणाऱ्या ५०० दशलक्ष किंमतीच्या वस्तूंवर भारताकडून बंदी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. यासाठी थेट पाकिस्तान किंवा मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या आयातींवर संपूर्णपणे बंदी घातली. तसेच पाकिस्तान नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. पाकिस्तानच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर तब्बल ५०० दशलक्ष डॉलर्सच्या पाकिस्तानी वस्तू दुसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात आयात करण्याचे षडयंत्र पाकिस्तानने रचले होते. पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता सीमाशुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे.

सविस्तर वाचा

16:57 (IST) 5 May 2025

'पहलगाममधील पर्यटनस्थळांवर सुरक्षा दल तैनात करा', मेहबूबा मुफ्ती यांची अमित शाह यांच्याकडे मागणी

“तुम्ही (केंद्रीय गृहमंत्री) दहशतवाद्यांवर केली पाहिजे. मात्र, आज पहलगाममधील १०० लोकांपेक्षा जास्त काश्मिरी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी आवाहन करत आहे की हे योग्य नाही. आज सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. मग अशा परिस्थितीत पर्यटन स्थळांवर सुरक्षा दल तैनात करण्याची आवश्यकता आहे. तसेच मी सरकारला आवाहन करते की पहलगाममध्ये पर्यटकांना घोडे पुरवणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पर्यटनस्थळे बंद झाल्याने वर्षभरासाठी हॉटेल आणि टॅक्सी चालकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावं”, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

16:55 (IST) 5 May 2025

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मेहबूबा मुफ्तींची केंद्राकडे 'ही' महत्वाची मागणी; म्हणाल्या, "पुढील एक वर्षभरासाठी…"

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे आणि येथील पर्यटनस्थळे बंद करण्यात आल्यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. ...सविस्तर बातमी
15:20 (IST) 5 May 2025
Pahalgam Terror Attack Live Updates: मोठी बातमी! पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन; म्हणाले, “या लढाईत…”

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले. तसेच दहशतवादाच्या विरोधातील लढाईत रशिया भारताबरोबर ठामपणे उभा आहे, असा संदेश पुतिन यांनी दिला. या हल्ल्यातील गुन्हेगार आणि त्यांचे सूत्रधार यांना चांगला धडा शिकवला जावा, असेही पुतिन यावेळी म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1919323397617848415

13:32 (IST) 5 May 2025

Pahalgam Terror Attack Live Updates: दिल्लीत घडामोडींना वेग; पंतप्रधान मोदी आणि संरक्षण सचिव यांच्यात बैठक संपन्न

भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झालेला असताना दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नौदल प्रमुखांची, रविवारी हवाई सेनेच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर आज संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यामुळे दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे म्हटले जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1919289151205040147

11:21 (IST) 5 May 2025

Pahalgam Terror Attack Live Updates: पूंछमध्ये दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरून सुरक्षा दलांनी स्फोटके केली जप्त

भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे एका संशयित दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा भांडाफोड केला. याठिकाणी पाच स्फोटके, रेडिओ उपकरण, दुर्बिण आणि ब्लँकेट जप्त केले. तसेच स्टिलच्या बादलमीमध्ये दोन आयईडी लावल्याचेही यावेळी आढळून आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणाहून दोन वायरलेस सेट, युरियाची पाच पाकिटे, पाच लिटरचा गॅस सिलिंडर, दुर्बिण, तीन लोकरीच्या टोप्या, तीन ब्लँकेट, पँट आणि भांडी जप्त करण्यात आली आहेत.

10:27 (IST) 5 May 2025

अतिरेक्यांना कथित अन्न-निवारा पुरविणाऱ्या व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू; कुटुंबाने लष्करावर केले आरोप

Kulgam Custodial Killing: दहशतवादी लपलेली जागा दाखिण्यासाठी आणले असताना इम्तियाज जलील मगरे याने नदीत उडी घेतली. यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणात लोकांनी गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले आहे. ...अधिक वाचा
09:04 (IST) 5 May 2025

Pahalgam Terror Attack Live Updates: भारत-पाकिस्तानच्या वाढत्या तणावानंतरसंयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक होणार

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. या तणावावर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, ही बैठक बंद दाराआड होणार असून भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधावर चर्चा करण्यात येईल, असे समजते.

Pahalgam Terror Attack Updates in Marathi

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला BSF कडून अटक (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)