उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाकिस्तानी नागरिकाने राम जानकी मंदिर आणि इतर मालमत्ता विकल्याचे आढळून आले. मात्र, आता या प्रकरणात शत्रू संपत्ती कार्यालयाच्या अभिरक्षकाने मंदिर आणि इतर दोन मालमत्ता ‘शत्रू’ मालमत्ता म्हणून सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर मंदिर विकत घेऊन नंतर हॉटेल बांधणाऱ्यांनाही नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉटेल बांधणाऱ्यांना नोटीस
कर्नल संजय साहा, मुख्य पर्यवेक्षक आणि सल्लागार ऑफ द गार्डियन ऑफ एनीमी प्रॉपर्टीच्या कार्यालयाने सांगितले की, या प्रकरणी लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. साहा यांनी सांगितले की, “आम्ही त्यांना पाच विशिष्ट प्रश्नांसह नोटीस पाठवली आहे आणि त्यांच्या उत्तरांची वाट पाहत आहोत. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.”

कागदपत्रांमध्ये हे ठिकाण आजही मंदिर म्हणून ओळखले जाते

खरं तर, १९८२ मध्ये आबिद रहमान नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने बेकनगंजमधील मुख्तार बाबा नावाच्या व्यक्तीला जमिनीचा तुकडा विकला होता. जमिनीचा हा भाग मंदिर परिसर म्हणून कागदपत्रांमध्ये नोंदवला गेला आहे. मुख्तार बाबा हे या मंदिर परिसरात सायकल दुरुस्तीचे दुकान चालवायचे. १९६२ मध्ये आबिद रहमान पाकिस्तानात गेले, जिथे त्यांचे कुटुंब राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक आबिद रहमान मुख्तार बाबाला जमीन विकण्यासाठी तात्पुरता भारतात परतला होता. जमीन विकत घेतल्यानंतर मुख्तार बाबाने त्या ठिकाणी राहणारी १८ हिंदू घरे बेदखल करून हॉटेल बांधले. कानपूर महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये हे ठिकाण आजही मंदिर म्हणून ओळखले जाते, असे तपासात समोर आले आहे.

प्रकरणाची चौकशी सुरु

गतवर्षी शत्रू मालमत्ता संरक्षण संघर्ष समितीने तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे प्रकरण सह दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले होते. त्यानंतर ही माहिती कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टीच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आली. मात्र, या प्रकरणी मुख्तार बाबाचा मुलगा महमूद उमर याने दावा केला की, त्यांच्याकडे जमिनीशी संबंधित सर्व ठोस कागदपत्रे असून, लवकरच प्रश्नांची उत्तरे देऊ.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak citizen sold kanpur ram janaki temple buyer built hotel dpj
First published on: 20-05-2022 at 15:53 IST