कर्तारपूर कॉरिडॉर: इम्रान खान यांच्याकडून मनमोहन सिंग यांना उद्घाटन सोहळयाचे निमंत्रण

इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळयाचे निमंत्रण दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळयाचे निमंत्रण दिले आहे. नऊ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. इम्रान खान यांनी शब्द दिल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेला कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन होईल असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानक साहिब आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील गुरुद्वारा दरबार साहिब ही दोन शीख धर्मस्थळे जोडण्यात येत आहेत. इम्रान खान यांनी पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब कॉरिडॉरच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. मनमोहन सिंग हे निमंत्रण स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. पण मनमोहन सिंग यांनी भारतातील डेरा बाबा नानक साहिबच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मनमोहन सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानात प्रचंड आदर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींऐवजी मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pak pm imran khan invites manmohan singh for kartarpur corridor opening dmp

ताज्या बातम्या