जम्मू काश्मीरमधील उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक तणावाचे झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावर दोन्ही देशातील प्रसारमाध्यमातील वातावरण देखील ढवळून निघाल्याचे दिसले. भारताने उरी हल्ल्याचा बदला घेतल्याचे सांगत भारतीय प्रसारमाध्यमांनी लष्करी कारवाई आणि भारत सरकारचे कौतुक करत पाकिस्तानची कुरघोडी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी लष्कराने सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली नसल्याचे सांगत पाकिस्तान सरकारच्या सुरात सूर मिळविण्यात धन्यता मानली. खेळाच्या मैदानात भारत- पाकिस्तान यांच्यातील जोश आपण पाहिला आहे. भारत पाकिस्तान सामन्यावेळी प्रसारमाध्यमे चाहत्यांचा जोश आणि उत्साह टिपत असतात. मात्र दोन्ही देशातील चाहत्यांच्यातील उत्साह टिपणाऱ्यां प्रसारमाध्यमांनी सर्जिकल स्ट्राईकनंतर आपल्यातील जोश
दाखवून दिला. सर्जिकल स्ट्राईकच्या मु्द्यावरुन भारत पाकिस्तान प्रसारमाध्यमांमध्ये आक्रमक वृत्तांकन करताना दिसली.भारत पाकिस्तान संबंधाविषयी चर्चेसाठी प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर सहभागी झालेले पाहुणे देखील आक्रमकपणे आपला मुद्दा मांडताना दिसले.

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेले वृत्तांकन आपण पाहिले असेल,मात्र पाकिस्तानमध्ये कशाप्रकारे वृत्तांकन झाले याची अनुभती देण्यासाठी newslaundry.com वेबसाइटने भारत आणि पाकिस्तान प्रसारमाध्यमांतील आगपाखड एकत्रित करुन एक व्हिडिओ तयार केला आहे.या व्हिडिओच्या सुरुवातीला भारतीय प्रसारमाध्यमाला स्थान दिल्याचे दिसते.’एबीपी माझा’या हिंदी वृत्तवाहिनीवरील सूत्रसंचालक सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा थरकाप उडाला असल्याचे सांगताना दिसते. तर पाकिस्तानची सूत्रसंचालक आमच्याशी टक्कर घेऊन नका, असे आक्रमकपणे सांगताना दिसते.