Asim Munir ID Verification Video Viral : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. असीम मुनीर हे कायम भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसतात. आता याच असीम मुनीर यांची जर्मनीतील एका कार्यक्रमात चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

जर्मनीतील म्युनिकमध्ये आयोजित सुरक्षा परिषदेच्या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी असीम मुनीर आतमध्ये प्रवेश करत असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी असीम मुनीर यांना त्यांचं ओळखपत्र व्यवस्थित दाखवण्यास सांगितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नाचक्की झाल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

जर्मनीतील म्युनिकमध्ये आयोजित सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी असीम मुनीर त्यांच्या टीमसह दाखल झाले. मात्र, कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ ते दाखल होताच त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी असीम मुनीर यांना त्यांच्या नावाच्या बॅचकडे बोट दाखवत म्हटलं की ‘तुमचं आयडी कुठं आहे?’ यावेळी असीम मुनीर हे काही क्षण गोंधळून गेले.

पण सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात लटकलेल्या ओळखपत्राकडे इशारा करत म्हटलं की, ‘तुम्ही ते फिरवू शकता का?’ (ओळखपत्र व्यवस्थित करू शकता). दरम्यान, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, पाक लष्करप्रमुखाची ही फजिती झाल्याच्या घटनेच्या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

असीम मुनीर यांचा अपमान?

म्युनिकमधील सुरक्षा परिषदेत जाताना असीम मुनीर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने आणि त्यांच्या आयडीबाबत विचारल्याच्या घटनेमुळे हा असीम मुनीर यांचा अपमान असल्याचा आरोप आता केला जात आहे.

म्युनिक सुरक्षा परिषद म्हणजे काय?

म्युनिक सुरक्षा परिषद ही एक प्रमुख जागतिक व्यासपीठ मानली जाते, त्या ठिकाणी अनेक देशांचे नेते, राजनयिक आणि सुरक्षा तज्ञ दरवर्षी जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटतात. यावर्षीच्या परिषदेत असीम मुनीर यांच्या उपस्थितीचा आणि सुरक्षा तपासणीचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.