पीटीआय, इस्लामाबाद

रोख रकमेच्या चणचणीचा सामना करत असलेला पाकिस्तान रशियाकडून प्रति बॅरल ५० डॉलर; म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जी-७ देशांनी लागू केलेल्या किंमत मर्यादेपेक्षा बॅरलमागे १० डॉलर कमी दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा सुनियोजित प्रयत्न करत आहे.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Israel succeeded in preventing an unexpected attack by Iran
इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी; इराणनी सोडलेली ३०० हून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

कच्चे तेल सध्या जगभरात बॅरलमागे ८२.७८ अमेरिकी डॉलर दराने विकले जात आहे. प्रचंड बाह्य कर्ज आणि कमकुवत झालेले स्थानिक चलन यांच्याशी झगडत असलेला पाकिस्तान काहीही करून रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याचे प्रयत्न करत आहे.

मॉस्कोहून कच्च्या तेलाची पहिली खेप पुढील महिनाअखेरीस पाकिस्तानात येण्याचे ठरले असून, यामुळे भविष्यात आणखी मोठय़ा कराराचा मार्ग मोकळा होईल, असे वृत्त ‘दि न्यूज’ने दिले आहे.

रशियाच्या बंदरांमधून कच्चे तेल समुद्रमार्गे पाकिस्तानात पोहोचण्यास ३० दिवस लागतील. वाहतुकीच्या खर्चामुळे या तेलाच्या किमतीत बॅरलमागे १०-१५ डॉलरने वाढ होईल, असे या वृत्तात नमूद केले आहे.