तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान देशाची सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने तालिबानकडून अमेरिकन लष्करी शस्त्रांची खरेदी करत आहे, अशी बातमी एएनआयने दिली आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून पाकिस्तानमध्ये सीमेपलीकडील हिंसाचारात वाढ झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर उत्तर वझिरीस्तानमध्ये-टीटीपीचा बालेकिल्ला असलेल्या दहशतवाद्यांविरोधात ते मोठ्या कारवाया करत आहे.

अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने ताब्यात घेतलेली अमेरिकन शस्त्रे, अफगाण बंदुक विक्रेत्यांद्वारे दुकानांमध्ये खुलेआम विकली जात आहेत. यूएस प्रशिक्षण आणि सहाय्य कार्यक्रमांतर्गत, ही उपकरणे मुळात अफगाण सुरक्षा दलांना देण्यात आली होती. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर, तालिबानने मोठ्या प्रमाणात शस्त्रे जमा केली आणि दुकानांमध्ये खुलेआम बंदुका विकल्या आहेत.

दरम्यान, भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीबाबत चिंता व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेनुसार, लष्करी अधिकार्‍यांना असा विश्वास आहे की, शस्त्रास्त्रांचा वापर पाकिस्तानमधील हिंसाचारासाठी आयएसआय-पुरस्कृत दहशतवादी गट भारतात येण्यापूर्वी करतील. तसेच अधिकार्‍यांनी भारतात कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना देखील शस्त्रे पुरवली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

“ही अमेरिकन शस्त्रे, विशेषत: लहान शस्त्रे पाकिस्तानला पाठवली जात असल्याचे अनेक इनपुट्स आहेत. पण तालिबानच्या विजयामुळे ज्या प्रकारे दहशतवादी गटांना प्रोत्साहन मिळाले आहे, त्यामुळे या शस्त्रांचा वापर पाकिस्तानकडून हिंसाचारासाठी केला जाण्याची शक्यता आहे,” असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी एजन्सीला सांगितले.