भारतीय पाणबुडी रोखल्याचा पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानी नौदल सतत सज्ज असून व्यावसायिक सतर्कता बाळगून आहे. आम्ही पुन्हा एकदा भारताची पाणबुडी येताना शोधली आहे असे पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे.

भारताची एक पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत असताना रोखल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

ही भारतीय पाणबुडी पाकिस्तानी नौदलाच्या गस्ती विमानाने पाहिली होती, असे पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाने म्हटले आहे की, १६ ऑक्टोबरला ही पाणबुडी पाकिस्तानी सागरी हद्दीत येताना दिसली.  भारतीय नौदलाकडून हा  प्रकार तिसऱ्या वेळी झाला असून  तीनही वेळा या पाणबुड्या शोधण्यात  पाकिस्तानी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या गस्ती विमानांनी यश मिळवले आहे. आताच्या घटनेचे चित्रीकरणही पाकिस्तानने प्रसारित केले आहे. 

पाकिस्तानी नौदल सतत सज्ज असून व्यावसायिक सतर्कता बाळगून आहे. आम्ही पुन्हा एकदा भारताची पाणबुडी येताना शोधली आहे असे पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे.

यापूर्वी असा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता. त्यावेळी पाकिस्तानी नौदलाने भारतीय पाणबुडीचा सागरी हद्दीत प्रवेश रोखला होता. पाकिस्तानी नौदलाने त्यांचे विशेष कौशल्य वापरून भारतीय पाणबुडीला घुसण्यापासून रोखले असे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्येही भारतीय लष्कराच्या पाणबुडीने पाकिस्तानी सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan claims to have stopped indian submarine akp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या