पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एका मशिदीत सैनिक आणि पोलीस कर्मचारी नमाज अदा करीत असताना अचानकपणे बॉम्बस्फोट झाला. सोमवारी (३० जानेवारी) झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १०० नागरिकांचा मत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालिबानी दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. दरम्यान याच आत्मघाती बॉम्बस्फोटाबद्दल पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताला उद्देशून एक विधान केले आहे. प्रार्थना करताना भारतातही लोक मारले गेले नाहीत, पण पाकिस्तानध्ये असे घडले आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ म्हणाले आहेत.

हेही वाचा >> विकासाचा वेग संथच! आर्थिक पाहणी अहवाल : पुढील वर्षी ‘जीडीपी’ ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंत

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
PNS Siddique naval base under attack
चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ नॅशनल असेंबलीमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मशिदीतील आत्मघाती बॉम्बस्फोटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना “भारत आणि इस्त्रायलमध्येही प्रार्थना करताना भाविक मारले गेले नाहीत. मात्र पाकिस्तानध्ये ते घडले आहे,” असे ख्वाजा असिफ म्हणाले.

ख्वाजा असिफ यांनी २०१०-२०१७ या काळातील दहशतवादी हल्ल्यांचाही उल्लेख केला. “हे युद्ध पीपीच्या काळात स्वात भागापासून सुरू झाले. तर पीएमएल-एनच्या मागील कार्यकाळात कराचीपासून ते स्वातपर्यंत पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाली. मला जास्त बोलायचे नाही. पण आपणच दहशतवादाची बीजे पेरली आहेत. दहशतवादापासून मुक्तता हवी असेल तर आपल्याला २०११-२०१२ साली जशी एकता दाखवण्यात आली होती, अगदी तशाच एकतेची गरज आहे,” असे ख्वाजा असिफ म्हणाले.

हेही वाचा >>मोदींच्या धोरणांमुळेच राहुल-प्रियंका गांधी बर्फवृष्टीचा आनंद लुटू शकले,’ भाजपा नेत्याचे विधान

दरम्यान, पाकिस्तानमधील मशिदीत बॉम्बस्फोट झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बगची यांनी भारताच्या वतीने दु:ख व्यक्त केले. “आम्ही पेशावर येथे झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे अरिंदम बागची ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.