Earthquake in Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठा विध्वसं झाला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत ५,००० हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. तुर्कस्तानात शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या इमारतींच्या मलब्याखाली हजारो लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. अनेक ठिकाणी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या भूकंपानंतर तुर्कस्तानात तिथल्या सरकारकडून ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, तुर्कस्तानच्या मदतीसाठी भारतासह जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत. परंतु यादरम्यान, पाकिस्तानने मात्र त्यांची हेकेखोर वृती पुन्हा एकदा दाखवली.

स्वतःला तुर्कस्तानचा जवळचा मित्र म्हणवून घेणाऱ्या पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही. वृत्तवाहिनी WION च्या वेबसाईटने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. मदतकार्यासाठी तुर्कस्तानला जाणाऱ्या भारतीय विमानाला हवाई क्षेत्र देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे.

Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

पाकिस्तानने त्यांचं हवाई क्षेत्र वापरण्यास परवानगी न दिल्याने भारतीय विमानाला लांबचा प्रवास करावा लागला, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तुर्कस्तानला मदत पोहोचवण्यात उशीर झाला. भारताने तुर्कस्तानला मदत पाठवल्यानंतर तुर्कीचे भारतातले राजदूत फिरात सुनेल यांनी भारताचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी ट्विट केलं आहे की, “सकंटकाळात मदतीला धावून येतो तोच खरा मित्र.”

हे ही वाचा >> “…तोच खरा मित्र”, भूकंपानंतर मदत पाठवणाऱ्या भारताचे तुर्कस्तानने मानले विशेष आभार

भारताने पाठवलेल्या एनडीआरएफच्या पथकात ५ महिला कर्मचारी

गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवरून तुर्कस्तानला पोहोचलेल्या भारताच्या एनडीआरएफच्या पथकात एकूण ५१ कर्मचारी आहेत. ज्यामध्ये ५ महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. तर दुसऱ्या पथकात ५० जण आहेत असं सांगण्यात आलं आहे. भारताने तुर्कीला एक वैद्यकीय पथक देखील पाठवलं आहे.