लख्वीच्या तुरुंगवासात तीन महिन्यांची वाढ

२००८ मधील मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, पण पुन्हा त्याला सार्वजनिक शांतता आदेश (एमपीओ) अंतर्गत पुन्हा तीन महिने तुरुंगवासात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२००८ मधील मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, पण  पुन्हा त्याला सार्वजनिक शांतता आदेश (एमपीओ) अंतर्गत पुन्हा तीन महिने तुरुंगवासात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
   लख्वी (वय ५४) याला सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था आदेशानुसार आणखी तीन महिने तुरुंगात ठेवले जाईल असे फिर्यादी पक्षाचे प्रमुख चौधरी अझर यांनी सांगितले. पाकिस्तानने भारताला याबाबत माहिती कळवली आहे. लख्वीला जामिनावर सोडल्याबाबत भारताने नाराजी व्यक्त केली होती व त्याच्या विरोधात संसदेत ठरावही मंजूर केला आहे.
  लख्वी  याला इस्लामाबादच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने काल पुराव्याअभावी जामीन मंजूर केला होता. पण त्याला आता पुन्हा अदियाला तुरुंगात राहावे लागेल. लख्वी  याचा  जामीन आदेश तुरुंगअधिकाऱ्यांना दाखवण्याच्या आधी त्याला पुन्हा अटक करण्याचा आदेश तुरुंग अधिकाऱ्यांच्या हाती पडणार आहे.
फिर्यादी पक्षाचे प्रमुख चौधरी अझर यांनी सांगितले की, लखवीला जामीन देण्याच्या निर्णयावर सोमवारी पाकिस्तान सरकार अपील करणार आहे. लख्वी  याला जामिनावर सोडण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली असून पेशावर हल्ल्यानंतर सोडण्याच्या वेळेबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवाझ शरीफ सरकारही लख्वीला जामिनावर सोडल्याने व्यथित झाले असून दहशतवादाचा मुकाबला करण्याचा निर्धार केला जात असताना मुंबई हल्ल्यातील या दहशतवाद्याला सोडण्याबाबत भारताने टीका केली आहे असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे.
  लख्वी  याला जामिनावर मुक्त करण्यापूर्वी पुन्हा अटक करणे महत्त्वाचे आहे नाही तर तो पळून जाण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले. लखवीला जामिनावर सोडल्याची बाब पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लक्षात आणून देताच त्यांनी त्याला पुन्हा तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले आहेत.
   इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला जामिनावर सोडण्याचा जो निकाल दिला त्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मुंबई हल्लाप्रकरणी सात आरोपींविरुंद्ध १५ किंवा अधिक साक्षीदारांना हजर करण्यात आले नाही.  २००९ मध्ये मुंबई हल्ल्याचा खटला सुरू करण्यात आला होता व त्यात ४६ साक्षीदार सादर करण्यात आले होते.
   लख्वी , अब्दुल वाजीद, मझहर इक्बाल, हरमद अमीन, सादिक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद व युनूस अंजुम यांच्यावर मुंबई हल्ल्यात नियोजन, अर्थपुरवठा केल्याचा आरोप आहे. मुंबई हल्ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला होता व त्यात १६६ जण मृत्युमुखी पडले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan detains zakiur rehman lakhvi for 3 more months

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या