Pakistan’s Fake Claims About Rafael: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तीन भारतीय राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी खोटा असल्याते म्हणत फेटाळून लावला आहे.
“या प्रकरणी भारताने आमच्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही, त्यामुळे नेमके काय घडले हे आम्हाला माहित नाही. पण आम्हाला माहित आहे की पाकिस्तानी जे म्हणत आहेत (तीन राफेल नष्ट केले) ते चुकीचे आहे,” असे पॅरिस एअर शोच्या आधी फ्रेंच मासिक चॅलेंजेसला दिलेल्या मुलाखतीत डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तानमधील लष्करी तणावावर थेट भाष्य करण्याचे टाळत, ट्रॅपियर यांनी राफेल जागतिक दर्जाचे लढाऊ विमान असल्याचे स्पष्ट केले. “आम्हीच सर्वोत्तम आहोत असे म्हणणे नेहमीच कठीण असते, परंतु माझा विश्वास आहे की, आम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला हवेतून हवेत लढाई, जमिनीवर हल्ले, आण्विक प्रतिबंध आणि विमानवाहू वाहक तैनात करण्यास सक्षम असलेले एकच विमान हवे असेल तर राफेलची कोणीही स्पर्धा करू शकत नाही.”
ट्रॅपियर पुढे म्हणाले की, “राफेलचा अमेरिकेच्या एफ-२२ शी संघर्ष झाला तर, एफ-२२ च्या गुप्त आणि हवाई श्रेष्ठतेमुळे राफेलला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. पण “जर तुम्ही बहुपयोगिता आणि प्रत्यक्ष लढाईसाठीची तयारी महत्त्वाची मानत असाल, तर राफेल हे चीनच्या एफ-३५ पेक्षाही श्रेष्ठ ठरते आणि चीन सध्या त्यामध्ये ज्या काही सुविधा देते, त्यापेक्षा राफेल निश्चितच अधिक प्रभावी आहे.”
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी सैन्याने पाच भारतीय विमाने पाडली आहेत, ज्यात तीन राफेलचा समावेश आहे.” मात्र, आता डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनीच हा दावा खोडून काढत राफेलच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे.
दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या लष्करी संघर्षात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलाचे मोठे नुकसान केले आहे. चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने सहा पाकिस्तानी लढाऊ विमाने, दोन देखरेख विमाने, एक सी-१३० वाहतूक विमान, ३० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोन नष्ट केले होते.
भारतीय संरक्षण सूत्रांनी सांगितले आहे की, जरी भारताचे काही नुकसान झाले असले तरी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई मालमत्तेचे मोठे नुकसान केले. चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने सहा पाकिस्तानी लढाऊ विमाने, दोन देखरेख विमाने, एक सी-१३० वाहतूक विमान, ३० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोन नष्ट केल्याचे वृत्त आहे.
फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले राफेल लढाऊ विमाने २०२० मध्ये त्यांच्या समावेशापासून भारताच्या हवाई दलाची मोठी ताकद बनले आहेत