लख्वीच्या अटकेला स्थगितीविरोधात पाक सरकार सर्वोच्च न्यायालयात

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रेहमान लख्वी याच्या अटकेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला पाकिस्तान सरकारने तेथील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रेहमान लख्वी याच्या अटकेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला पाकिस्तान सरकारने तेथील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
झकीउर रेहमान लख्वी याला पुन्हा ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने निलंबित केला. २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी त्याला याआधीच जामीन मंजूर केला होता, पण भारताने संसदेत त्या निर्णयाचा निषेध केल्यानंतर त्याला पुन्हा तीन महिने कोठडीत टाकण्यात येईल, असे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्याला पुन्हा तुरुंगात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच पाकिस्तान सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
दरम्यान, लख्वी याला सध्या अपहरणाच्या खटल्यात पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे तो अद्याप तुरुंगातच आहे. मात्र, अपहरणाच्या आरोपावरून केलेल्या अटकेला लख्वी याने न्यायालयात आव्हान दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan govt challenges hcs suspension of lakhvis detention

ताज्या बातम्या