MBA ते शेतकरी…अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांसंबंधी धक्कादायक माहिती उघड

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दहशतवाद्यांच्या मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि ६ संशयितांना पकडले

Delhi Police busts terror module arrests 6
दिल्लीत पाकिस्तानचे मोठे षडयंत्र उघड करत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. (Photo ANI)

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दहशतवाद्यांच्या मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि ६ संशयितांना पकडले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे म्हणणे आहे की, सणांचा हंगाम, दसरा, नवरात्री, रामलीला हे त्यांच्या हिटलिस्टवर होते. ज्यामध्ये कोणतीही मोठी दहशतवादी घटना त्यांना घडवायची होती. अटक केलेल्या सहाजणांपैकी दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासलं जात आहे.

दरम्यान, हे दहशतवाद्यांसंबंधी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्रातील जान मोहम्मद शेख (४७), दिल्लीतील जामियानगरचा ओसामा (२२) उर्फ ​​सामी, उत्तर प्रदेशातील रायबरेलीचा मूलचंद उर्फ ​​लाला (४७) आणि बहराइच, उत्तर प्रदेशचा मोहम्मद अबू बकर (२३) या दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या सर्वांना १४ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. इतर दोन आरोपी जीशान कमर आणि मोहम्मद अमीर जावेद यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अटक केलेले संशयित दहशतवादी कोठे राहतात, ते येथे काय करतात ही माहिती देखील समोर आली आहे. इंडिया टुडेने याबाबत माहिती दिली आहे.

जीशान कमर- उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या जीशानने एमबीए केले आहे आणि दुबईमध्ये अकाऊंटन्ट म्हणून काम केले आहे. करोना संकटाच्या वेळी तो लॉकडाऊनमध्ये घरी आला. इथे तो आता खजुराचा व्यवसाय करत होता.

आमिर जावेद- उत्तर प्रदेशच्या लखनौ येथून अटक करण्यात आलेला आमिर हा जावेद जीशानचा नातेवाईक आहे. आमिरने अनेक वर्षे सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे काम केले आहे. त्यांनी धार्मिक शिक्षणही दिले. आमिर जावेदच्या वडील आणि भावाला अद्याप विश्वास नाही की त्यांच्या मुलाचे अंडरवर्ल्ड किंवा दहशतवादी संबंध आहेत. आमिरचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा फक्त त्याचे काम करायचा. तो सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी सरळ घरी यायचा.

जान मोहम्मद- व्यवसायाने चालक असलेला जान मोहम्मद शेख उर्फ ​​’समीर’ ला २००१ मध्ये एका हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे होती. जान मोहम्मद यांचे कुटुंब मध्य मुंबईच्या सायन येथे राहते.

मूलचंद उर्फ ​​लाला-  उत्तर प्रदेशातील रायबरेलीचा मूलचंद उर्फ ​​लाला अंडरवर्ल्डशी जोडलेला होता, असे सांगितले जात आहे. इथे तो शेती करायचा.

हेही वाचा- पाकिस्तानचा डाव उधळला: अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगमध्ये ISI चा सहभाग उघड

अबू बकर- हा बहराइचचा रहिवासी आहे. जेद्दा येथे तो काम करायचा. त्यानंतर तो परत आला. २०१३ मध्ये त्यांने देवबंद येथील मदरशात शिक्षण घेतले. अबू बकर  त्याचा भाऊ मोहम्मद उमरसोबत बहराइचच्या कैसरगंज भागात राहत होता. त्याचे वडील सुन्ना खान गेल्या अनेक वर्षांपासून सौदीच्या जेद्दा शहरात राहत आहेत. मोहम्मद उमरने आपल्या भावाला निर्दोष म्हटले आहे. अबू बकर विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे.

ओसामा- दिल्लीतून अटक केलेले ओसामाचे कुटुंब ड्रायफ्रूटचा व्यवसाय करते. यामुळे, ओसामा अनेक वेळा व्यवसायाच्या संदर्भात मध्य पूर्वेच्या देशांमध्ये जात होता. असा आरोप आहे की तो आधी मस्कतला दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेला आणि नंतर समुद्रामार्गे पाकिस्तानात पोहोचला.

पोलिसांनी या सर्वांना १४ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. इतर दोन आरोपी जीशान कमर आणि मोहम्मद अमीर जावेद यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan isi trained terror module busted who are the pakistan backed terrorists arrested by delhi police srk

ताज्या बातम्या