पाकिस्तानमध्ये खैबर-पख्तूनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट, २५ ठार

सकाळची वेळ असल्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ होती आणि यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढले.

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील हांगू येथे बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात २५ जण ठार झाले आहेत. तर किमान ३५ जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

हांगू येथील लोअर ओरकझाई येथील बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. सकाळची वेळ असल्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ होती आणि यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढले. या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षा दलांनी परिसर खाली केला असून सध्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी कराचीतील चीनच्या दुतावासासमोर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यामागे बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. एका दिवसात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan khyber pakhtunkhwa hangu bomb blast several killed injured