भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असून आज पुन्हा पाकिस्तानकडून जम्मू येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यादरम्यान जम्मूमध्ये पूर्णपणे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी आकाशात पाकिस्तानकडून सोडण्यात आलेले क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाहायला मिळाल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बारामुल्ला आणि पंजाबमधील पठाणकोट यासह अनेक ठिकाणी वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
“जम्मूमध्ये वीजपूरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. मोठे स्फोट… बॉम्ब आणि शेलिंग किंवा क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची शक्यता आहे. घाबरू नका माता वैष्णो देवी आपल्या बरोबर आहे आणि भारतीय सशस्त्र दलही आपल्याबरोब आहे,” असे जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक शेष पॉल वैद म्हणाले.
Complete blackout in Jammu. Loud explosions—bombing, shelling, or missile strikes suspected. Fret not—Mata Vaishno Devi is with us, and so are the valiant Indian Armed Forces.
— Shesh Paul Vaid (@spvaid) May 8, 2025
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू विमानतळावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील ड्रोनने मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. तसेच सांबा येथून मोठ्या प्रमाणात आर्टिलरी आणि ड्रोन हल्ले झाल्याचे वृत्त आहे.
स्थानिकांनी देखील त्यांना अनेक ठिकाणी सायरनचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले. यासह अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी मिसाईल इंटरसेप्शन सीस्टम सुरु करण्यात आल्याची माहिती दिली आहे.