पाकिस्तान १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय जनगणना करणार आहे. ही जनगणना बुधवारपासून (दि.१५) सुरू होणार आहे. यासाठी २ लाखांहून अधिक सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. पाक सैन्याचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर आणि सूचना मंत्री मरियम औरंगजेब यांनी पत्रकार परिषदेत देशातील सहाव्या वेळेस होणाऱ्या जनगणनेसंबंधीच्या तयारीची माहिती दिली.
दोन टप्प्यात ही जनगणना होणार असून २५ मेपर्यंत पूर्ण करायचे लक्ष्य आहे. प्रत्येक जनगणना अधिकाऱ्याबरोबर किमान एक-एक सैनिक असेल. प्रत्येक घरी जाऊन कुटुंबाची विस्तृत माहिती घेणार आहेत.
लाहोर उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात हाफिज सईदच्या याचिकेवर सुनावणी
पाकिस्तानमध्ये जमात-उद-दवाचा प्रमूख हाफिज सईद आणि इतर चार दहशतवाद्यांविरोधी कायद्यांतर्गत नजरबंदीविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर लाहोर उच्च न्यायालयाचे एक बेंच २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमुर्ती सय्यद मन्सूर अली शहा यांनी या प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या पीठातील दोन सदस्य बदलले होते. नवे बेंच हे द्विसदस्यीय असून न्यायमूर्ती सय्यद काजिम रजा शम्सी हे प्रमुख असतील.